पालेबारसा येथील स्वयंभु पुरातन महादेव मंदिरात तीर्थयात्रा - भक्तीभावाने गोपाळकाला करीत पूजन

 

सावली - पालेबारसा येथे पुरातन स्वयंभु महादेव मंदिर असून महाशिवरात्री निमित्त गोपालकाला व पूजन मोठया थाटात करण्यात आले. पुरातन विभागाने तीर्थस्थळ घोषित करण्याची इच्छा भक्तांनी व्यक्त केली. 

         पालेबारसा येथे पुरातन काळातील शिव मंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्री चा उत्सव साजरा करण्यात येतो. १४ फरवरी ला घटस्थापना व १५ फरवरीला गोपालकाला करण्यात आला.  पालेबारसा येथे पुरातन स्वयंभु महादेव मंदिर असून परिसरातील नागरिकानी मोठया भक्तीभावाने पूजा पाठ करून दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप आले होते. पुरातन विभागाने धार्मिक पर्यटन घोषित करून विकास करण्याची इच्छा भक्तांनी व्यक्त केली.  यावेळी उपस्थित असलेले इंदिरा गांधी विध्यालायाचे प्राचार्य लोखंडे, जेष्ठ नागरिक खेडेकर गुरुजी, माजी संचालक तथा अध्यक्ष विविध सेवा सहकारी खुशाल लोडे यांच्या उपस्थित गोपाळ काला व महाप्रसाद वितरण करण्यात आला. पालेबारसा येथील पुरातन स्वयंभु शिवमंदिरात माहाशिवरात्री उत्सव चे आयोजक रमेश  तिवाडे, उमाकांत धुळसे, प्रवीण  बुटोलिया, विठ्ठल सिडाम, डॉ पटेल, मिलिंद धुळसे, शिवचरण कुमरे, चंद्रशेखर वाळके, संदीप धुळसे, गोकुळ गेडाम, नेमाजी धुळसे, प्रशांत चिमुरकर, विलास कावळे, बंडू धुर्वे, प्रिया बुटोलिया, उर्मिला धुळसे, कोमला सिडाम, अश्विनी धुळसे, श्रीमती गुज्जनवार, सविता भांडारकर, जया वाळके, मुक्कान पटेल, मंगला धुळसे, लता कुमरे, विद्या हजारें, तिवाडे मॅडम, इत्यादिनी महाशिवरात्री मोहोत्सव आयोजन करून यशस्वीरित्या पार पाडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!