जनकापूर येथे शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन;
तळोधी (बा.) प्रतिनिधी:
शंभु सेना मंडळ जनकापूर यांचें विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने १८ ते १९ फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमांचे उद्घाटन मुख्याध्यापक विजय बोरकर, तर सहउद्घाटक जेष्ठ पत्रकार राहुल रामटेके, तर अध्यक्ष म्हणून जनता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष चक्रधर रोहनकर भुषविणार आहेत. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून शिवव्याख्याते लक्ष्मीकांत कारिंगवार, प्रा.गोवर्धन मातेरे, शासकीय कंत्राटदार राकेश काशिवार, प्रितम मेश्राम, पुरुषोत्तम काशिवार,अशोक बोरकर, चुकाराम काशिवार, सुरेश डाहारे, शमसेरसिंग जुनी, राकेश बावनकर, दिलिप पडोळे, रमेश मेश्राम, आशिष काशिवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिवजन्मोत्सव सोहळा निमित्ताने रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा खो-खो स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, सामुहिक नृत्य स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, रक्तदान शिबीर, तथा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील जनतेनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आव्हान शंभु सेना मंडळ जनकापूर यांनी केलें आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!