चिमूर उमरेड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर कोळशाने भरलेला ट्रक पलटी
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिनांक. २१/०२/२०२६ ला चिमूर उमरेड राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर कोळशाने भरलेला ट्रक भय्यूजी महाराज शाळेजवळील वळणावर पलटी झाला असून यात सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
सविस्तर माहिती अशी की नरेश भदुजी गिरडे वय ५१ वर्ष यांनी पोलीस स्टेशन चिमूर येथे दिलेल्या माहिती नुसार चिमूर उमरेड राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरील कुंभारे ट्रेडर्स समोर दिनांक. २१/०२/२०२६ ला वेळ पहाटे ०५:०० वाजताच्या सुमारास कोळशाने भरलेला १८ चाकी ट्रक क्र. MH 40 LS 8543 या चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने चालविल्याने कोळशाने भरलेला ट्रक हा पलटी झाला. त्यामुळे या रस्त्यावर असलेली नगर परीषद चिमूर चे मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
1) LED streetlight fiting 110 w= rs 9620 x 2 = 19240
2) Galvanized octagonal Pole 9 Meter =rs 35439/-
3) Armoured Cable (Aluminium 4x16 sq mm)= rs 248.98x80 meter=19918.4/-
4)Road Divider 10.mm work=20000/-
5) Road Cleaning =6000/-
totel Estimated Cost = rs 1,00,597.4/- या ट्रकच्या अपघातामुळे नगर परीषद चिमुर चे रुपये 1,00,597.4/- नुकसान झाले आहे. सदर चा रस्ता रस्ता NHAI च्या मालकीचा आहे परंतु सदरचे रस्त्यावरील स्ट्रीट लाईट व साफसफाईची जबाबदारी नगर परिषद ची आहे म्हनुन ट्रक क्र. MH 40 LS 8543 चे चालक यांनी आमचे नगर परीषद चिमुरचे मालमत्तेचे नुकसान केले म्हनुन गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. सदर रिपोर्ट यांच्या लेखी रिपोर्ट वरुन पंचनामा करुन दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास
चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!