दुचाकी व ट्रॅव्हलरचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिनांक. २१/०२/२०२६ ला नेरी नवरगाव मार्गावरील खुटाळा बस्टॉप जवळ सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान दुचाकी व ट्रॅव्हलर यांच्यात समोरा - समोर झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर एक युवक गंभीर जखमी झाला असून नागपूर येथे पुढील उपचारासाठी दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.
मृतक हितेश कचरुजी गुरुनुले वय २७ वर्षे राहणार खुटाळा व गंभीर जखमी आशिष मन्सराम श्रीरामे वय २९ वर्षे राहणार खुटाळा येथील रहिवासी असून दोघेही दुचाकीने औषधे आणण्यासाठी नेरीकडे जात असताना नेरीकडून भरधाव वेगात येणाऱ्या फोर्स कंपनीच्या ट्रॅव्हलर क्रमांक.MH40 AK 7898 वाहणाने दुचाकीला जबर धडक दिल्याने धडकेची तीव्रता इतकी जोरदार होती की दुचाकीस्वारास उपचारासाठी नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला असून शव शवविच्छेदन करण्यासाठी उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले आहे.
सध्या स्थितीत वातावरण तापले असता या दरम्यान, संबंधित ट्रॅव्हलर वाहन चालकावर भारतीय दंड संहिता नुसार अप.क. व कलम - 293/2026 कलम 281,125 (a),125 (b), 106 (1) 184 मो.वा.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर ट्रॅव्हलर वाहन व दुचाकी वाहन चिमूर पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली. ट्रॅव्हलर चालक अमोल गिरडे (रा. नेरी) यांना घटनास्थळ पंचनामा करून पुढील चौकशीसाठी पोलीस स्टेशन येथे ताब्यात घेतले होते.ट्रॅव्हलर वाहणाच्या दस्तामध्ये तृटी असल्याचेही समोर आले असून प्रवीण वाघे यांच्या मार्फत हे वाहन बुकिंग करीता वापरले जात असल्याचे समोर येत आहे. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!