महाराष्ट्रात 'लव्ह जिहाद' व अवैध धर्मांतर विरोधी कायदा' तात्काळ लागू करा; हिंदू जनजागृती समितीसह विविध महिला संघटनांची मागणी ! जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मा. मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर!
महाराष्ट्रात 'लव्ह जिहाद' व अवैध धर्मांतर विरोधी कायदा' तात्काळ लागू करा; हिंदू जनजागृती समितीसह विविध महिला संघटनांची मागणी !
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मा. मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर!
चंद्रपूर -
राज्यात लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी 'लव्ह जिहाद व अवैध धर्मांतर विरोधी कायदा' तात्काळ संमत करावा, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने २० फेब्रुवारी या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्री.विनय जी गौडा यांनी निवेदन स्वीकारले.
हे निवेदन देण्यासाठी शहरातील विविध महिला संघटनांनी आपला सक्रिय पाठिंबा दर्शवत सहभागी झाल्या.
महिलांवरील अत्याचार आणि फसवणुकीच्या घटना थांबवण्यासाठी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कठोर कायदा असणे आवश्यक आहे, अशी आग्रही भूमिका हिंदू जनजागृती समितीने मांडली आहे. या निवेदनाद्वारे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील विविध महिला संघटना, सामाजिक संस्था, अध्यात्मिक आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"आपल्या भगिनींच्या सुरक्षेसाठी आणि समाजात जनजागृती करण्यासाठी हा लढा आवश्यक आहे," असे मत मनोहरलाल टहलियानी माजी अध्यक्ष व्यापारी असोसिएशन चंद्रपूर तसेच गायत्री परीवार चंद्रपूर चे श्री वासुदेवजी राठोड यांनी व्यक्त केले.
निवेदन देतांना श्री विश्वास माधमशेट्टीवार,विश्व हिंदू परिषद, श्री सुहास दाणी व श्री प्रणिल नरमशेट्टीवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चंद्रपूर,सौ मंगला दरवे,सौ दिपाली सिंगाभट्टी,सौ प्रिती लिमजे,सौ सत्याली देव,सौ दक्षता इंगळे सौ मनिषा पाचभाई,सौ नरमशेट्टीवार सनातन संस्था, वंदनाताई बोरेकर व सौ विद्या ताई ईटणकर शिक्षिका गायत्री गुरुकुल कान्वेंट, सौ विमलताई वासलवार गायत्री परिवार महिला जिल्हाप्रमुख, सौ कुसुमताई उदार माजी नगरसेविका व समाजसेविका
इत्यादी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
याचप्रमाणे गडचिरोली कोरपणा, राजुरा, बल्लारपूर,मुल, सिंदेवाही तसेच घुग्गुस येथे सुद्धा हिंदू जनजागृती समिती व
इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने तहसीलदार साहेब यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना हे निवेदन पाठवण्यात आले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!