भावाने केली बहिणीची निर्गुण हत्या

आईवरही जीवघेणा हल्ला

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

भद्रावती : - भद्रावती शहरातील झिंगुजी वॉर्ड येथे मंगळवारी रात्री सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास घरगुती वादातून थरारक घटना घडली घडली असून सख्ख्या भावाने आपल्या अविवाहित बहिणीवर धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्गुण हत्या केल्याची घटना घडली आहे.या घटनेत मृत युवतीचे नाव संजीवनी शंकर भोंडे (वय ३२) असे असून ती अविवाहित असुन आरोपी भाऊ सूरज शंकर भोंडे, रा. झिंगुजी वॉर्ड, भद्रावती याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे.माहितीनुसार, कुटुंबा मध्ये आई-मुलगी, मुलगा-वडील असे वेगवेगळे घरात स्वयंपाक करून राहत होते मागील काही दिवसांपासून घरगुती वाद सुरू असुन घटनेच्या दिवशी किरकोळ कारणावरून भाजी हिसकावून घेतल्याच्या वादातून संतापलेल्या भावाने एका सतूरसारख्या धारदार शस्त्राने बहिणीवर सपासप वार करून गंभीर जखमी केले असता संजीवनीचा जागीच मृत्यू झाला. स्वतःच्या मुलीला वाचवण्यासाठी धावलेल्या आईवरही मुलाने धारदार शस्त्राने हात, पायावर वार करून तिला सुद्धा गंभीर जखमी केले आहे. या घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. असून घटना पंचनामा करत आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे,तसेच स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळ पंचनामा केला.
जखमी आईची प्रकृती चिंताजनक असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या घटनेच्या अधिक तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!