औषध प्रशासनाची शेगाव येथील नामांकित मेडिकलवर धाड

चार महिन्यापासून फार्मासिस्ट विना सुरू होते मेडिकल स्टोअर

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - तालुक्यातील शेगाव येथील एका नामांकित डॉक्टरच्या मेडिकल स्टोअरवर चंद्रपूर येथील औषध प्रशासनाचे कर्मचारी यांनी तपासणी केली असता मागील चार महिन्यापासून फार्मसीष नसताना सुद्धा सर्रासपणे एका नामांकित डॉक्टरची मेडिकल चालवत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने चंद्रपूर येथील औषध प्रशासनाच्या अधिकारी यांनी तात्पुरती कारवाई करत तात्काळ मेडिकल बंद करायला लावले तसेच  यावर काय कारवाई होईल हेच पाहणे आवश्यक असुन औषध प्रशासनाने वारंवार अशा मेडिकलवर कारवाई करणे अपेक्षित असून यासारखे आणखी काही ठिकाणी सुद्धा नियमबाह्य पद्धतीने मेडिकल स्टोअर सुरू आहेत काय ? ज्याकडे औषध प्रशासनाने नियमित चौकशी करणे गरजेचे असुन, या सर्व कारवाईकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!