राष्ट्रीय महामार्ग 353 ई देतोय अपघाताला निमंत्रण
ठिक ठिकाणी जीव घेणे खड्डे डागडुजी मात्र करणार कोण?
लोकप्रतिनिधीचे कमालीचे दुर्लक्ष जनतेचा जीव मात्र टांगणीला
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - राष्ट्रीय महामार्ग 353 ई वरील वरोरा चिमूर रस्त्याचे बांधकाम पूर्ण होण्याच्या आधीच ठीक ठिकाणी मोठमोठे जीवघेणे खड्डे तसेच मोठ मोठ्या भेगा पडलेल्या असुन हा राष्ट्रीय महामार्ग 2016 मध्ये बांधकामात सुरुवात करण्यात आली होती मात्र अद्यापही या महामार्गाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही तरीही बांधकामात झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कित्येक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याला मोठ्या प्रमाणत तडाही गेलेले आहे या भेगा एवढ्या मोठ्या आहेत की एका दुचाकीचे संपूर्ण चाक यामध्ये जाऊन वारंवार यावर अपघात होऊन सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कमालीचे दुर्लक्ष दिसून येत आहे तसेच क्षेत्रातील जनप्रतिनिधी सुद्धा याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचे जनतेमधून बोलल्या जात आहे. त्यामुळे यावर पडलेल्या भेगा व खड्डे यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील जनते मधून होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!