वैनगंगा नदीच्या काठावर सिंदपूरी रूयाड येथे पय्या मेत्ता संघाचे संघानुशाषक धम्मदूत भदंत संघरत्न मानके जी यांच्या अथक परिश्रमाने जापानी पॅगोडा शैलीतील भव्यदिव्य असे महासमाधी महास्तूपाचे निर्माण

महास्तुपाचा वर्धापन दिन व आंतरराष्ट्रीय धम्मोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - वैनगंगा नदीच्या काठावर सिंदपूरी रूयाड येथे पय्या मेत्ता संघाचे संघानुशाषक धम्मदूत भदंत संघरत्न मानके जी यांच्या अथक परिश्रमाने जापानी पॅगोडा शैलीतील भव्यदिव्य असे महासमाधी महास्तूपाचे निर्माण करण्यात आले असून या महास्तुपाचा वर्धापन दिन व आंतरराष्ट्रीय धम्मोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन आज दि ०८ फेब्रुवारी २०२६ ला करण्यात आले लाखो लोकांचा जनसागर महासमाधी महाविहाराच्या भेटीला आले होते.तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर व देंग्योदायशी साइच्यो यांच्या मुर्ती समोर भाविक नतमस्तक होऊन शांततेचा संदेश घेतला,
या कार्यक्रमाला आमचे नेते ,मार्गदर्शक मा.डॉ.परिणयजी फुके साहेब विधानपरिषद सदस्य महाराष्ट्र राज्य यांची उपस्थिती लाभली ,यावेळी मा. फुके साहेब यांनी महासमाधी महास्तूप करिता ५.०० कोटी रु इतका निधी मंजूर केला. व पुढील वर्षी या कार्यक्रमाला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार असे आश्वासन दिले.यावेळी माझ्या सह पवनी भाजपा अध्यक्ष  संदीप नंदरधने जी, भाजपा चे जेष्ठ नेते ऍड महेंद्र गोस्वामी जी, पवनी न प चे उपाध्यक्ष सोनू बावनकर जी , गट नेते सुरेश अवसरे जी, नगरसेवक सोनू दंडारे जी, ता महामंत्री राकेश पाखमोडे जी , यादव मेंगरे जी,अनु जाती मोर्चा अध्यक्ष संदीप मोटघरे जी, पंकज देशमुख जी, तिलक वैद्य अध्यक्ष भाजपा पवनी तालुका उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!