महसुल विभागाच्या आर्शिवादाने एम के एस कंपनी चे रात्रो ला अवैध मुरुमाचे उत्खनन

एम के एस कंपनी ची मुरुम उत्खनन व मुजोरी 

वनविभागाच्या सुचने लाही दाखवली केळाची टोपली

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - चिमुर तालुक्याती भिसी लगत मौजा पुयारदंड येथे मागील एक महिन्यापासून रॉयल्टी च्या नावावर मुरमाचे उत्खनन नियमित सुरू आहे. मुरमाचे उत्खनन रॉयल्टी ही दिवसा ला दिली जाते पण रात्रीला शुध्दा मुरमा चे उत्खनन एम के एस कंपनी द्वारे केले जात आहे. शेकडो ब्रास अवैध मुरमाचे उत्खनन नामांकित एम के एस कंपनी कडून होत आहे. या सर्व प्रकार ची माहीती महसुल विभाला असुन शुध्दा महसुल विभाग डोळे झाक करीत आहे.रात्रीच्या उत्खनन ला महसुल विभागाचा पुर्ण पणे आर्शिवाद आहे.
  एम के एस कंपनी ची उत्खनन वर मुजोरीचा प्रकार सुरू असल्या चे दिसुन येत आहे. रात्रीला उत्खनन करू नये अश्या प्रकारची सुचना वनविभाकडून स्पष्ठ  देण्यात आली असताना शुध्दा रात्री ला अवैध मुरुमाचे उत्खनन नियमित एम के एस कंपनी कडून होत आहे.उत्खनन हे जंगल लगत असल्याने वन्यप्राणी या परीसरात राहात असतात. या उत्खनन परीसरातुन वन्य प्राणी जात-येत असतात. वनविभाच्या सुचनेला एम के एस कंपनी कडून केळाची टोपली दाखवण्यात आली आहे.यामुळे वन्य प्राणीला शुध्दा वाहाना मुळे जीवाला धोका होऊ शकतो.
  रात्रोला होणाऱ्या अवैध मुरुम उत्खनन ची चौकसी जिल्हा अधिकारी कडून करण्यात यावी.अश्या प्रकारची नागरीका कडून मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!