सावली येथे भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या प्रतिकृतीचे लोकार्पण - अजय देहाडे यांनी गीतातून केले प्रबोधन
सावली - सावली शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ‘भीमा कोरेगाव’ विजय स्तंभाच्या प्रतिकृतीचे लोकार्पण माता भीमाई जयंतीच्या शुभपर्वावर पार पडले. यानिमित्त प्रसिद्ध गायक अजय देहाडे यांनी बुद्ध-भीम गीतांच्या माध्यमातून प्रबोधन केले.
ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार, माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून व सहकार्यातून भीमा कोरेगाव विजयस्तंभ उभारण्यात आले. त्याच विजयस्तंभाचा लोकार्पण पार पडला. लोकार्पण सावलीच्या नगराध्यक्षा साधनाताई वाढई व गडचिरोली जिल्हा परिषद चे माजी सदस्य ऍड. रामभाऊ मेश्राम यांचे हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी प्रसिद्ध गायक अजय देहाडे यांचा प्रबोधनात्मक बुद्ध - भीमगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी बांधकाम सभापती जि.प. चंद्रपूर दिनेश पाटील चिटणुरवार होते. यावेळी सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन गोहने, महिला तालुका अध्यक्षा उषाताई भोयर, सावली शहर काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णा राऊत, माजी सभापती विजय कोरेवार, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार, माजी नगराध्यक्षा लता लाकडे, माजी शहर अध्यक्ष तथा नगरसेवक विजय मुत्यालवार, माजी नगराध्यक्ष विलास यासलवार, युवा शहर अध्यक्ष अंकुश शेंडे, युवा विधानसभा उपाध्यक्ष नितीन दुवावार, महिला शहर अध्यक्षा भारती चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन नगरसेवक अंतबोध बोरकर यांनी मानले. या सोहळ्यास बहुसंख्य बौद्ध अनुयायी, महिला कार्यकर्त्या, युवक-युवती, काँग्रेस पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सावली शहर काँग्रेस पदाधिकारी व नगर पंचायत नगरसेवक यांच्या वतीने करण्यात आले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!