भिसी येथे श्री वाल्मिकी क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न
आर्वी टीमचा अव्वल क्रमांक
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - भिसी येथील श्री वाल्मिकी क्रिडा मंडळाच्या वतीने स्व. आयुष नरेशजी बावणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य एकदिवसीय रात्रीच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आर्वी टीमने अव्वल क्रमांक पटकावला, तर भिसी टीमने दुसरा क्रमांक मिळवला. पेंढरी पवनी आणि इतर सर्व टीमने चांगली कामगिरी केली.
स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस व शिल्ड वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. या मान्यवरांमध्ये अध्यक्ष नगर पंचायत भिसी अतुल पारवे, उपाध्यक्ष किशोर मुंगले, सभापती हर्षल डुकरे, नगरसेवक अक्षय नागपुरे, ग्राम विश्व संघर्ष वाहिनीचे गजेंद्र चाचरकर,लीलाधर बंसोड,कृषिभूषण मोरेश्वर झाडे,कृष्णा तेजने, मच्छीमार अध्यक्ष मनोज दिघोरे,किशोर आश्टणकर,सुरेंद्र मेश्राम,सुरेंद्र घरत, आणि बंडू तुंबेकर यांचा समावेश होता. प्रथम क्रमांक चे पारितोषिक आमदार बंटी भांगडीया यांचे तर्फे होते.
या स्पर्धेत ग्रामीण भागातील २५ टीमनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या हरिष धोंगडे, वैभव गायकवाड, कुणाल नागपूरे, सौरभ वाघ, अविनाश शिवरकर, आदित्य भानारकर, प्रज्वल भोयर, आदित्य दिघोरे, नंदू चाचरकर, वैभव निमजे, राकेश दिघोरे, संजय शिवरकर आणि इतर सर्व मुलांनी मेहनत घेतली आणि छान नियोजन केले. त्याबद्दल त्यांचा देखील सत्कार मान्यवरांकडून करण्यात आला, गजेंद्र चाचरकर यांनी भारतीय खेळांना प्रोत्साहन देण्याच्या महत्त्वावर भर दिला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!