नेहरू विद्यालय चिमूर तर्फे शिवजयंती निमित्त चिमूर शहरात निघाली शोभायात्रा

जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांनी दुमदुमली चिमूर नगरी

शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )

चिमूर : –  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चिमूर यांच्या वतीने शहरातून शिवशोभायात्रा काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक प्रसंगांचे सादरीकरण करत “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. कार्यक्रमाची सुरुवात उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक तथा विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. अश्विन अगडे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी मुख्याध्यापक निशिकांत मेहरकुरे, परमानंद बोरकर, माजी विद्यार्थी श्रीहरी सातपुते, भारती गोडे आदी उपस्थित होते.
           शोभायात्रा नेहरू चौक, डॉ. अब्दुल कलाम चौक, गुरुदेव किराणा चौक, संताजी जगनाडे महाराज चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने काढण्यात आली. नागरिकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. व्यापारी संघटनेतर्फे अल्पोपहाराची तर माजी विद्यार्थ्यांकडून पाणी व मिठाईची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धोपटे मैडम, उमरे मॅडम, वाघधरे सर,दांडेकर सर, गोमासे सर,गौरकर सर,चौधरी सर, सहारे सर, मेश्राम सर, शेंडे सर व विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!