सिंदेवाहीत आग व संरक्षण तसेच मानव–वन्यजीव संघर्षावर कार्यशाळा



"वनवा जंगलच जाळत नाही तर परिसरातील साधन संपत्ती जाळतो, वन्यजीव मानवी अधिवासात येऊन मानव वन्यजीव संघर्ष निर्माण होउन मानवाचे जीवन पण धोक्यात येतात त्यामुळे वनव्यापासून जंगलाला आणि स्वतःच्या परिवाराला वाचवा." - यश कायरकर.
सिंदेवाही : 
        ब्रम्हपुरी वन विभागाचे अंतर्गत सिंदेवाही वन परिक्षेत्र येथे 'आग प्रतिबंध, संरक्षण उपाययोजना तसेच मानव–वन्यजीव संघर्ष' या विषयांवर जनजागृती करण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात परिसरातील संपूर्ण वन समित्या पोलीस पाटील सरपंच पत्रकार यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील योगेश लोंढे होते.
   या कार्यशाळेला स्वाब नेचर फाउंडेशनचे प्रमुख यश कायरकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी जंगलात वनवा लागण्याची कारणे यामध्ये "नैसर्गिक फक्त एक टक्के तर 99% मानवनिर्मितच बनवावे लागलेला असतो आणि हाच वनवा जंगलातील साधनसंपत्ती नष्ट करून पर्यावरणास धोका निर्माण करतो, वडव्यामुळे जंगलातील हिरवळ नष्ट होऊन तृणभक्षी प्राणी शेत आणि गावात येतात. त्यांच्या मागे मासभक्षी प्राणी पण येतात आणि आणि मानव वन्यजीव संघर्षात भर पडतो. त्यामुळे वनव्यापासून जंगलाला आणि स्वतःच्या परिवाराला वाचवा." असे यांनी सांगितले.  यावेळी वन्यजीव प्रेमी ललित उरकुडे, WPSIचे प्रतिनिधी रोशन धोत्रे, अंजली बोरावार वनपरिक्षेत्र अधिकारी, तसेच नागभिड येथील आरती बगमारे यांनी मार्गदर्शन केले. वन आग रोखण्यासाठी  खबरदारी, वन्यजीवांचे संरक्षण, तसेच मानव व वन्यजीवांमधील संघर्ष कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन गडपायले (क्षेत्र सहाय्यक) यांनी केले. सूत्रसंचालन माधुरी सुरपाम वनरक्षकयांनी केले, तर आभार प्रदर्शन रवी सिडाम यांनी मानले. कार्यशाळेला पोलिस पाटील, वन हक्क समिती सदस्य, पत्रकार, नागरिक, विद्यार्थी व वनविभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!