वाघ दिसल्यावर दगड मारणे पडले महागात, वाघाच्या हल्यात गोंविदपूर येथील इसम जखमी.
तळोधी बा:
ब्रम्हपुरी वनविभागाअंतर्गत येत असलेल्या तळोधी बा. वनपरीक्षेत्रातील गोंविदपुर बिटात आज सकाळच्या 11:30 वाजताच्या दरम्यान वाघाच्या हमल्यात इसम जख्मी झाल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त, प्रत्यक्षदर्शीनुसार गोंविदपुर बिटातील जंगलालगत कक्ष क्रमांक 569 मध्ये घोडाझरीच्या छोट्याशा नहरा जवळ पाण्याच्या बाजूला झुडपात बसून असलेला वाघ लोकांना दिसल्यानंतर जमाव एकत्र येऊन त्याला दगड मारत असताना चिडलेल्या वाघाने हमला केल्याने गोंविदपूर येथील रामराव वासुदेव नेवारे वय ४० हा इसम जखमी झाल्याची घटना घडली. जखमी अवस्थेत वनविभागाच्या वतीने सदर इसमाला नागभीड येथील ग्रामीण रुगणालयात प्राथमीक उपचार करून ब्रम्हपुरी येथील दवाखान्यात भरती करण्यात आले. यावेळी तळोधी बा. वनपरीक्षेत्राचे वनपरीक्षेत्र अधिकारी शहा, गोंविदपूर वनक्षेत्रसहायक सय्यद, वनरक्षक कागणे यावेळी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!