वाघाच्या झुंजीत बछड्याचा मृत्यू



सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रातील घटना



वासेरा (चंद्रपूर): ताडोबा-अंधारी व्याघ्र

प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ८४२ मध्ये वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला. ही घटना शुक्रवारी (दि. ६) दुपारी १२ वाजता उघडकीस आली. मृत बछडा हा दीड वर्षांचा असून, वाघाच्या झुंजीत त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.

शिवनी परिसरात वाघ व बिबट्यांची संख्या बरीच वाढली आहे. शुक्रवारी वनरक्षक व अन्य वनकर्मचारी गस्त घालत असताना त्यांना झुडुपांमध्ये रक्त सांडलेले दिसून आले. त्यांनी परिसराचा शोध घेतला असता, वन कक्ष क्रमांक ८४२ मध्ये एक

वाघाच्या झुंजीत मृत्युमुखी पडलेला बछडा.

बछडा मृतावस्थेत आढळला. याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम यांना देण्यात आली. त्यानंतर बफर विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक एस. एस. दुबे, 'एनटीसीए'चे प्रतिनिधी बंडू धोतरे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी मुकेश भांदककर, पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. विलास गावखरे, पशुधन विकास अधिकारी डॉ. बजरंग सवारे, डॉ. कुंदन पोडचेलवार व 'टीटीसी'चे चमू घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बछड्याचा पंचनामा करून शवविच्छेदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!