असावं सुंदर व्यक्तिमत्व एखाद्याचं... होईल प्रत्येक क्षेत्रात कौतुक यशाचं...




खरंच....
अत्यंत मनमिळावू स्वभाव,कामाची तत्परता, जिद्द -चिकटी अंगी असलेल्या अष्टपैलू व्यक्तिमत्व सौं. रागिणी उर्फ नलिनी दिनेश आडेपवार नवनिर्वाचित नगरसेविका तथा सभापती (महिला व बालकल्याण विभाग)
 प्रभाग क्र.---(नगरपरिषद मूल )

अगदी छोटया-छोट्या कामातून त्या समोर येत गेल्या....मग समाजसेवचे व्रत हाती घेतले... आणि आता राजकारणात घेतलेली उत्तुंग भरारी.....

खरंच.... सारं काही वाखळण्याजोगे आणि कौतुकास्पद.!

शून्यातून विश्व निर्माण करण्याचं सुंदर उदाहरण म्हणजे रागिणी ताई.'
ना कुठलं आर्थिक पाठबळ ना कुठला राजकीय वारसा.....
 तरीही त्यांनी आपल्या अथक प्रयत्नांच्या जोरावर आणि जिद्दीने
मूल शहरात आपल्या कामाचा ठसा चांगलाच उमटवीला आहे.

साधारण: त्यांनी आपल्या कामाची सुरुवात 2003 पासून केली.

2003-2007 या काळात प्रबोधना बरोबरचं  जिल्हा परिषद  अंतर्गत येणाऱ्या   *महात्मा फुले हमी केंद्राद्वारे* शाळा बाह्य विद्यार्थ्यांचा सर्वे करून त्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ताईंनी केले.
त्यात भटक्या जमाती, कोरकू गोंड आदिवासी, शिख धर्मीय, इत्यादी मुलांचा समावेश होता.
हे शिकवणी वर्ग रात्रीची शाळा भरवून घेतले जायचे.

2009मध्ये सुवर्ण जयंती योजना द्वारे बचत गटाचे काम केले. त्याचबरोबर समाज विकास संस्थेद्वारे सचिव पद भूषविले.

सन 2012-2014 नगरपालिकेच्या उपक्रमा अंतर्गत मानव विकास कार्यक्रमाद्वारे दिपशाखा या योजनेतून  किशोरवायीन मुलींना मासिक पाळी व त्या संदर्भात घ्यावयाची काळजी, स्वच्छता आणि संरक्षण या बाबत प्रशिक्षण  देऊन जनजागृती कार्यक्रम केले.

सावित्री फातिमा संस्थेद्वारे कौटुंबिक सल्लागार केंद्रे चालविली.
त्याद्वारे विधवा, निराधार महिलांना मदत,पती -पत्नी वाद निवारण,हुंडा -मारहाण -मानसिक छळ,
लैंगिक समस्या
मालमत्ते संबंधित समस्या,
दारु व्यसन मुक्ती 
विवाह पूर्व मातृत्व, आरोग्यविषयक समस्या अश्या अनेक कौटुंबिक आणि  सामाजिक समस्याचे विवरण करण्याचे काम केले.

2010 मध्ये श्रमिक एल्गार संघटनेच्या अध्यक्षा पारोमिता गोस्वामी यांच्या मदतीने  बचत गटाचे सक्षमीकरण व बळकटीचे  काम हाती घेतले.

2017-2022 दरम्यान नगरपालिका अंतर्गत परिसर स्वच्छता, कचरा संकलन,घन कचरा व्यवस्थापन, कीटकनाशके,दूषित पाणी आजार यावर हि पथनाट्यद्वारे अनेक जनजागृती कार्यक्रम केले.

2018पासून त्या महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत सहयोगिनी पदावर आरूढ झाल्या.

त्यातून त्यांनी 150-200 बचत गट सक्षमीकरण केले त्याचं बरोबर संघाची बांधणी केली.

विधवा व एकल महिलांना कार्पेट सेंटर च्या मदतीने महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देण्यात यश मिळविले.

अश्या प्रकारे त्या अनेक नामांकित व्यक्तींशीआणि सामाजिक संस्थेशी जुळत गेल्या आणि आपल्या कामाला गती देत गेल्या.त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहेत.

2023 मध्ये *महिला शहर अध्यक्ष,राष्ट्रीय काँग्रेस पार्टी मूल* म्हणून प्रवेश घेतला.... आणि राजकारणात आपला झेंडा रोवला.

कोवीड -19 आपल्या सगळ्यांना माहिती आहे... अश्या महामारीच्या काळात सुद्धा त्यांनी आपल्या कामाला पायघडया बांधल्या नाहीत. अनेक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गरजु लोकांना अन्न, गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप इ.  केले.म्हणूनच
या काळात त्यांना सामाजिक क्षेत्रातील *मूल गौरव पुरस्कार* देण्यात आला.

 एवढी ही आदर्श कामे करताना... त्यांना पावलोपावली अपयश ही आलीचं..... कोणत्याही परिस्थितीत न डगमगता त्यांनी त्यांचे अविरत प्रयत्न सुरुच ठेवले.
असंख्य अडचनींवर मात, वैयक्तिक सुख -दुःख बाजूला सारून त्या कायम जनमाणसाच्या सेवेसाठी
तत्पर राहिल्या.
या संघर्षात मोलाचा वाटा म्हणजे त्यांच्या पतीराजांचा आणि त्यांच्या मुलींचा.
वेळोवेळी संधी आल्यावर घराच्या बाहेर पाऊल टाकण्याचे सामर्थ्य  आणि जबाबदारी पार पडण्या करिता दिलेली मुभा,जपलेला विश्वास...यावर सारं काही अवलंबून होतं.
त्याचबरोबर त्यांच्या आई-वडिलांचे त्यांच्या वर झालेले सुप्त संस्कार.
वेळोवेळी आलेली परिस्थिती, आर्थिक चणचण, आपल्या माणसातून झालेली फसगत अश्या अनेक प्रसंगातून, स्वानुभवातून त्या शिकत गेल्या.

मी मागच्या 4-5वर्षांपासून ताईंना जवळून बघितलं आहे.

ताईंनी सांगितलेला एक प्रसंग असा कि,
त्यांची आई बालपणात मनोरुग्ण झाली.उच्चशिक्षित असूनही तिची अवस्था बघून खूप वाईट वाटायचं.
तिचं लेखन,कवी मन,तीच बोलणं, तिची माणुसकी,हे सर्व डोळ्यांनी बघून मोठी झाली.

 आईला कुठलेही भान राहत नसत.अगदी वेड्यासारख वागणं. आपल्या मुलं -मुलींना न ओळखणं असा तिचा आजार होता.दवाखान्यात अनेक इलाज केले परंतु काही जमले नाही. आई सोबत अनेक जिल्हयात राहण्याचा अनुभव आला.आणि त्यातूनच हिंमत वाढीत गेली. लोक जुळवायला त्यांचा स्वभाव कामी आला.
रागिणी ताई  सर्वात लहान होती त्यामुळे तिच्यावर या गोष्टीचा प्रभाव पडला. आईची अशी स्थिती बघवत नव्हती पण त्यासाठी त्यांना काही करता ही आले नाही.
काही दिवसांनी त्या सोडून गेल्या.
ताईचे, लग्न झाल्यावर त्यांना आईच्या रूपात  अनेक आया-बहिणी दिसू लागल्या. आईसाठी काही करता आले नाही ही आयुष्यभराची उणीव तर  होतीच त्यामुळे
आपल्या साभोवतालच्या परिसरात असं काही दृष्टीस आलं कि त्यांना आईची आठवण कायम सलत असे.
अश्या वृत्तीतुनच त्यांना महिलांसाठी काम करण्याचे बळ मिळाले.

पैसा तर कोणीही कमवतो...पण नाव कमवता येणं म्हणजे खऱ्या आयुष्याची सांगता आहे. 

ताई,
आपण निवडून आलात आणि नगरसेविका तसेच सभापती म्हणून रुजू झाल्या. ही आपल्या समाजासाठी फारच अभिमानास्पद गोष्ट आहे.


ताई आपले कर्तृत्व फार मोठे आहे; त्यासाठी शब्द ही अपुरे पडतील... तरीही मी केलेला हा छोटासा प्रयत्न. 
आपण जुळवलेली माणसं,मैत्रीपूर्ण- नाती, आया-बहिणींचा आशीर्वाद हेच कायम साक्षीदार राहतील 

प्रभावी जीवनशैली, खंबीर नेतृत्व,अश्या नारीशक्तीला माझा सलाम 
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...!!

-✍️ सौं. स्नेहा आशिष आकनूरवार, मूल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!