चिमूर पोलिसांतर्फे फरार आरोपीची शोधमोहीम सुरु
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - फिर्यादी नामे सोहेल युनुस शेख वय 28 वर्ष जात मुस्लिम धंदा : मजुरी राहणार आझाद वार्ड चिमुर हे त्यांचे मित्रासोबत आझाद वार्ड चिमुर येथे बौध्द विहारासमोर उभे असतांना आरोपी जाहिद उर्फ जावा अब्दुल खुदुस वय 40 वर्ष राहणार गुरूदेव वार्ड चिमुर जिल्हा चंद्रपूर हा तेथे त्याचे हातात लोखंडी रॉड घेवुन आला व फिर्यादीस " तुम यहापर क्या कर रहे मादरचोद साले, तेरे अशा अवाच्य " अशी शिवीगाळ करून आरोपी जावा शेख यांनी त्यांचे मदतीला त्यांचे मित्र आरोपी रेहान अकिल शेख वय 20 वर्ष, जहिर जमीर शेख वय 19 वर्ष, आसिफ युसुफ शेख वय 35 वर्ष समस्त राहणार आझाद वार्ड चिमुर यांना आरोपी जावा शेख यांनी बोलाविले व या सर्वानी संगनमत करून फिर्यादी यांना हाता बुक्याने मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली तसेच आरोपी जाहिद उर्फ जावा अब्दुल खुदुस वय 40 वर्ष राहणार गुरूदेव वार्ड चिमुर यांनी त्यांचे हातातील लोखंडी रॉड फिर्यादी यांना मारला त्यामुळे फिर्यादीस चेहऱ्यास घासुन गेला त्यामुळे फिर्यादी जखमी झाले. फिर्यादी यांचे तोंडी रिपोर्ट व मेडिकल इन्जुरी रिपोर्ट वरून फरार आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन चिमुर येथे अप.क्र. 507 / 2025 कलम 296,118(1),351(2)(3), 3(5), 115(2),112 भा.न्या.सं.मध्ये गुन्हा दाखल असून आरोपी - जावा उर्फ अब्दुल जाहीद कुददुस शेख वय 39 वर्ष धंदा मजुरी रा.आझाद वार्ड, चिमुर जि. चंद्रपुर हा मागील दोन महिण्यापासुन फरार आहे.
वर्णन - वय 40 वर्ष, उंची: 5' फुट 10 इंच अंदाजे, रंग - सावळा केस - बारीक, बांधा - मजबुत, कपडे - पॅन्ट, शर्ट अशाप्रकारचा पोशाख आहे.व सदर गुन्ह्याचा तपास मल्हारी ताळीकोटे सपोनि पोलिस स्टेशन चिमुर हे शोध करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!