जिल्हा रस्ता सुरक्षा समिती चंद्रपूर तर्फे रह - वीर चा प्रसार

रस्ता सुरक्षा अभियान २०२६ मोहीम सुरु

अपघातग्रस्तांची मदत करा आणि पुरस्कार मिळवा

परिवहन विभागाचा स्तुत्य उपक्रम

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत 'रह--वीर' योजनेची माहिती, चंद्रपूर जिह्यात सर्वत्र मोहीम राबवित चिमूर तालुक्यात असलेल्या नेहरू विद्यालय चिमूर येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपुर यांचे तर्फे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत दिनांक. २४/०१/२०२६ ला या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये सह.मो.नी. परिवहन अधिकारी उमाले, मुख्यध्यापक तथा शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनीं यांच्या उपस्थितीत परिवहन अधिकारी उमाले यांनी या कार्यक्रमामध्ये रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत शासनाचे नवीन मोटर कायदे विषयक सल्ला तसेच माहिती दिली. सुरक्षित वाहन कशाप्रकारे चालवायचे नियमाचे पालन करावे वाहणाचे पूर्णतः दस्तावेज योग्य त्या रित्या उपयोगास येईल अशी अशापद्धतीत हाताळावे या बाबत माहिती दिली महाराष्ट्र शासनाचा 'रह - वीर' योजनेनुसार अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करा आणि पुरस्कार मिळवा प्रत्येक गंभीर अपघातातील रुग्णास घटनास्थळावरून तात्काळ मदत करीत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे जेणेकरून प्राण वाचेल असे केल्यास रोख पुरस्कार २५००० रुपयांची मदत दिली जाईल.तसेच वर्षातील १० सर्वात योग्य 'रह - वीर' व्यक्तींसाठी राष्ट्रीय पुरस्कार १,००००० रुपये दिल्या जाईल व याचा लाभ कशाप्रकारे घ्यावा याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. मोटार सायकल, सायकल वर हेल्मेट चा वापर करावा, सुरक्षित योग्य मार्ग शोधावा, अंधार असेल तेव्हा चमकणाऱ्या रेडीयमचा पुढे मागे चिटकवलेल्या स्टिकर्स चा वापर करावा जेणेकरून अंधारात सुद्धा वाहन असल्याचे दिसून येईल आणि अपघात होण्यापासून बचाव व सुरक्षितता प्राप्त होईल. रस्ता सुरक्षा अभियान २०२६ हि मोहीम संपूर्ण जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!