नागभीड येथे 'रंगारंग २०२६' उत्साहात साजरा.... सामुहिक वंदेमातरम ने आसमंत भारावले





नागभीड:

        स्व.प्रसाद स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट नागभीड च्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी 'रंगारंग २०२६' हा सांस्कृतिक सोहळा उत्साहात साजरा झाला. यात नागभीड नगरपरिषद क्षेत्रातील अनेक शाळा, कॅान्व्हेंट व महाविद्यालयांनी सहभाग घेतला.
          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.अमीर धमानी सर हे होते. तर रंगारंग चे संयोजक व माजी जि.प.सदस्य संजय गजपुरे , नागभीड नगरपरिषद चे उपाध्यक्ष प्रतिक भसिन , बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड. रविन्द्र चौधरी , प्रा.डॉ.मोहन जगनाडे सर, माजी सरपंच डॅा. रविन्द्र कावळे व जहांगीर कुरेशी , जनता विद्यालयाचे उपप्राचार्य चक्रधर रोहणकर , सॅन्जो पब्लिक स्कुल च्या प्राचार्य मेरी टॅाम मॅडम , स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष प्राचार्य देविदास चिलबुले सर, समिधा शिक्षण संस्थेचे सचिव अजयजी काबरा ,नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष गणेश तर्वेकर , माजी पंचायत समिती सभापती सौ. रेखाताई जगनाडे , तरंगिनी च्या संयोजिका व नगरसेविका सौ. प्रियाताई लांबट , अभाविप चे माजी प्रांतमंत्री शक्ती केराम यांची उपस्थिती होती .
          भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे स्फुर्तीगान असलेल्या वंदेमातरम ला १५० वर्षे पुर्ण झाल्याचे औचित्य साधून यावर्षी हीच थीम ठेवण्यात आली होती. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामुहिक वंदेमातरम घेण्यात आले. यामुळे संपूर्ण परिसर या गायनाच्या जोशपुर्ण आवाजाने भारावून गेला होता. कार्यक्रमात स्व. प्रसाद राऊत यांच्या भगिनी सौ. विणाताई नागमोती यांना भेटवस्तू देण्यात आली. तर नागभीड नगरपरिषद च्या नवनिर्वाचित व स्विकृत नगरसेवक यांचा ट्रस्टतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच  सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी नाश्त्याची सोय करणारे व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष दानशूर हनिफभाई जादा यांचाही सत्कार करण्यात आला. 
                   याप्रसंगी प्राचार्य डॅा. अमिर धम्माणी व प्राचार्या मेरी टॅाम मॅडम यांनी या सोहळ्याचे कौतुक करीत नागरिकांना सांस्कृतिक मेजवानी देण्यासाठी रंगारंग चे व्यासपीठ शाळा व महाविद्यालये यांना उपलब्ध करुन दिल्याचे सांगत विद्यार्थी याची वाट पाहत असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. प्रास्ताविकातुन ट्रस्टचे संयोजक संजय गजपुरे यांनी या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका मांडली. 
             या सोहळ्याला नागभीडचे माजी तहसीलदार व भंडारा येथील निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण, नागभीड पंचायत समिती च्या संवर्ग विकास अधिकारी सौ. स्नेहल लाड , गोंडवन विकास शिक्षण संस्थेचे सचिव रविन्द्र जनवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. या सर्व मान्यवरांच्या हस्ते सहभागी शाळा , कॅान्व्हेट व महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांना प्रसाद स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष हनिफ भाई जादा यांच्या कडून नाश्ता ची सोय करण्यात आली.
          कार्यक्रमाचे संचालन पराग भानारकर,स्वप्नील नवघडे,सतीश मेश्राम सर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रंगारंग चे संयोजक अमित देशमुख, पवन नागरे, प्रा. लोमेश दुधे , संजय ठाकरे , ओमप्रकाश मेश्राम,विजय बंडावार, प्रविण बंडावार , गुलाब राऊत, पंकज गरफडे , नितिन अनरसकर , विवेक गोहणे , प्रशांत राहुड, प्रीतम रगडे, क्षितिज गरमळे, प्रशांत भुरे , जितेन्द्र वानखेडे , रितेश कोरे,रोमी कटारे,सतीश जीवतोडे, विरु गजभिये, विक्रांत गजपुरे , तुषार गजभे, नाविन्य बंडावार , कलश अमृतकर , सुरज शास्त्रकार , विवेक नागरे , प्रणय दरवरे , रणजीत मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!