लोकांचे जीव धोक्यात घालून, लोहार खाणीला मंजुरी. प्रत्येक गावातील हजारो लोक विरोधात, आंदोलनाची तयारी.



यश कायरकर:
   राज्यातील सर्वाधिक वन्यजीव घनतेच्या परिसरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या अतिसंवेदनशील वन्यजीव कॉरिडॉरमध्ये प्रस्तावित लोहखनिज खाण प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली.
          राज्यातील सर्वाधिक वन्यजीव घनतेच्या परिसरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या अतिसंवेदनशील वन्यजीव कॉरिडॉरमध्ये प्रस्तावित लोहखनिज खाण प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली. राज्य वन्यजीव मंडळातील तज्ज्ञ सदस्यांचा विरोध असूनही हा निर्णय घेण्यात आल्याने वाघांसह अन्य वन्यजीवांच्या संवर्धनावर दुष्परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
*कुठं होणार लोहखदान?*
       ब्रह्मपुरीतील तालुक्यातील  व तळोधी वनपरिक्षेत्रातील लोहाडोंगरी दहा बारा गावापासून  जवळच असलेला हा डोंगर काचेपार राखीव जंगल क्षेत्रात येतो. सनफ्लाग नावाच्या पोलाद कंपनीला  लोहखनिज ब्लॉक लिलाव प्रक्रियेत मिळाला होता. हा खाण प्रकल्प ब्रह्मपुरी वन विभागातील कक्ष क्रमांक ४३९ मध्ये प्रस्तावित असून यासाठी सुमारे ३६ हेक्टर समृद्ध वनजमिनीला उध्वस्त करतो. ज्या मध्ये मोठी अठरा हजार तर इतर मिळून लाखो झाडं कत्तल केली जाणार,या परिसरातून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, ब्रह्मपुरी वन विभाग आणि घोडाझरी वन्यजीव अभयारण्य यांना जोडणारा वन्यजीव मार्ग जातो.
येथे वाघ, बिबटे, अस्वल, रानडुक्कर, सांबर, चितळ यांसह अनेक वन्यप्रजातींचा वावर आहे. त्यामुळे हा भाग जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. 
*तीन सदस्यीय अभ्यास समिती:*
    १६ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेला आला होता. ब्रह्मपुरी परिसरात वाढणारा मानव-वन्यजीव संघर्ष लक्षात घेता, तसेच प्रकल्पाच्या संवेदनशीलतेमुळे अभ्यास समिती नेमून निर्णय पुढे ढकलण्यात आला होता.
तीन सदस्यीय समितीने अहवाल दिल्यानंतर २४ जानेवारी २०२४ रोजी राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव आला. समितीने या प्रकल्पाला स्पष्ट नकार दिला. तरीही नंतरच्या बैठकीत समितीचे नकार डावलून काही अटी व उपाययोजनांसह या खाण प्रकल्पाला मंजुरी मिळाली. 
*संकटात जनता आणि वन्यजीव:*
चंद्रपूर जिल्ह्यात या वर्षी मानव वन्य प्राणी संघर्षात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही ५० च्या आसपास ४७-४८ असतेच. यातील निम्मे मृत्यू हे ब्रह्मपुरी वन क्षेत्रातील आहेत. आणि यातही जास्त घनता असलेला जंगल आणि मोठ्या प्रमाणात वन्यजीव यांचे वास्तव व आजूबाजूच्या परिसरामध्ये गाव शेती असलेला हा परिसर या खाणीमुळे संकटात आलेला आहे. यात वनजंगल पुन्हा कमी करण्याचा सरकारचा डाव अनाकलनीय आहे. मानव वन्य प्राणी संघर्षात भर घालण्याचे काम सरकारकडून होत आहे. वन्य प्राणी आणि मोठ्या 
 वाघांच्या हालचालींसाठी महत्त्वपूर्ण असणारा हा कॉरिडॉर खनिज कामांमुळे उद्ध्वर होण्याची भीती आहे.या संभावित प्रोजेक्टच्या आजूबाजूला घनदाट जंगल त्यात राहणारे शेकडो वन्यजीव त्यात पंधरा ते विस वाघ , दहा-बारा अस्वल, विस-तीस बिबट, शेकडो सांबर ,चितळ , निलगाय,रानगवे, जंगली डुकरे , वानर अशा प्रकारचे संपूर्ण वन्यजीव डिस्टर्ब होऊन आजूबाजूच्या गावांमध्ये शेतामध्ये घुसतील. या संभाव्य या संभावित प्रोजेक्टच्या आजूबाजूला गंगासागर हेटी, आकापुर, सावरला, सावंगी , पळसगाव,उसळला (मेंढा), खरकाळा ,आलेवाही, हस्तानपूर, जीवनापूर, वाढोणा, डोंगरगाव,येरगाव, आवळगाव,चारगांव,तलोधी, सावरगाव,बाळापुर, मेंडकी, रामपुरी, एकारा,बोधरा, वाद्रा, किटाळी, कच्चेपार ,सामदा, भुज,आवळगाव, गांगलवाडी,  असे मानवी वन्य मानवी वस्ती असलेले गाव आहेत. सोबतच या गावच्या शेती आजूबाजूच्या संपूर्ण परिसरातील शेती हा प्रोजेक्ट ला लागून आहेत यामुळे हे संपूर्ण वन्यजीव त्यांच्या शेतात घुसून त्यांच्या शेतपीक पूर्णपणे नष्ट करतील आणि शेतकऱ्याच्या आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होईल. परिसरातील गावांमधील आधीच सुरू असलेल्या मानव वन्यजीव संघर्षात भर घालतील. आणि या संपूर्ण परिसरातील लाखो लोकांचे जीव रोज धोक्यामध्ये असतील.

"आर्थिक भविष्य आणि आरोग्य संपदा नष्ट.*
 सोबतच प्रोजेक्टमुळे रात्रंदिवस ब्लास्टिंग, खाणीतून लोहाचा परिवहन, या संपूर्ण गोष्टीमुळे शेत पिकावर रोज उडणारा धूळ बसेल. व शेत पिक शेतकऱ्यांना घेता येणार नाही. या धुळामुळे लोकांना दमा ,अस्थमा, टिबी फेफड्याचे कॅन्सर,आणि त्वचे संबंधात इतर विकार, होऊन परिसरातील संपूर्ण जनतेचे आरोग्य सतत धोक्यात राहतील. 
त्यामुळे सुद्धा परिसरातील लोकांना आर्थिक नुकसान सोसावी लागेल या प्रोजेक्टमुळे फक्त संभावित 32 लोकांना रोजगार मिळेल तर लाखो लोकांचे पैसा, आरोग्य, आणि जिवन सतत धोक्यात येणार आहे. तर आता विचार करणे गरजेचे आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारला त्यांच्या मर्जीतील एका व्यक्तीच्या एका कंपनीच्या आर्थिक लाभ च्या मोबदल्यात परिसरातील लाखो लोकांचे जीवन धोक्यात येणार ,आपल्याला आपले भविष्य वाचवीने गरजेचे आहे. त्यासाठी या विरोधात मरेपर्यंत आंदोलन करण्यात येईल"
यश कायरकर, वन्यजीव प्रेमी,अध्यक्ष, स्वाब संस्था.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!