गडपिपरी ते गोठनगाव रस्त्या काम निकृष्ठ दर्जाचे

डांबरीकरणाचे पोपडे हातानेच निघतात

मुरुमा ऐवजी माती तर काँक्रेट रस्ता गायब

राजेंद्र जाधव यांची चौकसी ची मागणी

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमुर : - प्रधानमंत्री ग्राम  सडक योजनेत अंतर्गत गड्पिपरी ते गोठनगावं रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाच्या बांधकामात लाखोचा भ्रष्ट्राचार असून सदर रोडचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या जिल्हा कार्यालय चंद्रपूर येथे पुराव्यासाहित दाखल केली.
            सदर बांधकाम ३.२४कि.मी.चा असून या बांधकामाची मुदत ६/०९/२०२३ ते ०५/०९२०२४  या १ वर्षाच्या कालवधीत पूर्ण करावयाचा होता .परंतु सदर कंत्राटदार एन एन पुगलिया  नागपूर याने  हे काम आधीच मुदत बाह्य करून इस्टीमेट मध्ये नमूद असलेला २९५ मी.चा कॉन्क्रेट  रस्ता न करता रस्ताच खाऊनच टाकला. सदर बांधकाम 188 लक्ष रुपयाचे असून  यामध्ये 60 ते 70 लक्ष रुपयाचा भ्रष्ट्राचार असल्याचे कामच्या  गुणवत्तेरून  उघडकीस येत आहे.
                   सदर रस्त्याचे खडीकरण करतांना मातीचा सर्रास वापर करण्यात आला असून खडीकरणाचा थर सुद्धा अंदाजपत्रकानुसार नाही.या रस्त्यासाठी वापरलेली डांबर मिश्रित चुरी यामध्ये डांबराचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे ह्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे पोपडे हलक्या हातानेच निघण्याचा प्रकार उघडकीस आला .यासाठी गडपिपरी व गोठनगाव व येथील गावकर्यांनी विरोध केला असता त्यांना उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले.
               रस्त्याच्या साईड स्लोपिंग्ला ४ इंच मुरमाचा थर असावा असा उल्लेख असतांनी सुद्धा मुरुमाऐवजी काळ्या मातीचा सर्रास वापर केल्याचे पुरावे असून ते निदर्शनात येत आहे.अश्या प्रकारे या बांधकामात लाखो रुपयाचा भ्रष्ट्राचार झालेला आहे हे दिसून येत आहे.
        करिता या रस्ता बांधकामाचे पुढील बांधकाम त्वरित थांबविण्यात येऊन सदर बांधकामातील खडीकरण व डांबरीकरनातील भ्रष्ट्राचाराची चौकशी करून ठेकेदार व या रोडबांधकामाशी निगडीत असलेली यंत्रणा यांचेवर कारवाई करण्यात यावी.
या रस्त्याच्या इस्टीमेटमधील 295 मी. लांबीचा काँक्रिट रस्ता ठेकेदारांनी बांधला नाही.मुरूमा ऐवजी मातीचा वापर केला आहे. डांबरीकरणाचे  पोपडे हाताने सहजच निघतात.सदर बांधकामाच्या गुणवत्तेचा अभ्यास केला असता 60 ते 70 लाखाचा भ्रष्ट्राचार नक्कीच असून सदर बांधकाम मुदत बाह्य आहे. यामुळे सदर ठेकेदार व अभियंता वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अश्या प्रकारची मागणी
 राजेंद्र जाधव 
उपतालुका शिवसेना ( उबाठा )चिमूर केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!