मुल शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ स्मारक उभारा स्वराज्य स्वाभिमानी संघटनेची मागणी




महाराष्ट्राचे आराध्य दैवत  छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते त्यांचे जीवन हे शौर्य, दूरदृष्टी व न्यायप्रियता होते यातून आजही आपल्याला प्रेरणा मिळते. त्यांचे हे विचार आणि कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांना आदरांजली, श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वत्र स्मारके असणे अत्यंत आवश्यक आहे आपल्या मुल शहरामध्ये सुद्धा आज पर्यंतच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज  यांचे स्मारक नसने ही खुप मोठी शोकांतिका आहे .त्याच अनुषंगाने स्वराज्य स्वाभिमानी संघटनेच्या वतीने मुल शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ स्मारकांची निर्मिती करण्याची मागणी मुल नगर परिषदेचे नगराध्यक्ष सौं. एकताताई समर्थ व मुख्याधिकारी नगरपरिषद मुल यांना निवेदनाद्वारे  केली  प्रभाग क्रमांक 7 मध्ये तलावाच्या बाजूला असलेल्या *छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात* किंवा चंद्रपूर रोडवरील *शहीद स्मारकाच्या बाजुला*  नगर परिषदच्या खुल्या जागेचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराज  याचे अश्वारूढ स्मारकाची निर्मिती करण्यात यावी व स्मारकाच्या मागील व सभोवतालच्या बाजूस किल्ल्याचं  स्वरूप देऊन सुशोभित व विद्युत रोषणाई करून आकर्षक करण्यात यावे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे केवळ दगड-विटांचे बांधकाम नसून, ते स्वराज्याच्या स्वप्नाची आणि त्यांच्या आदर्शांची आठवण करून देणारे एक पवित्र स्थान ठरेल, अशी आमची अपेक्षा आहे.


तरी, आपण या निवेदनावर गांभीर्याने विचार करून योग्य कार्यवाही करून एक सुंदर स्मारक मुल शहरामध्ये निर्माण करण्याची मागणी आकाश कावळे अध्यक्ष स्वराज्य स्वाभिमानी संघटना मुल व संदीपभाऊ मोहबे भाजपा मुल शहर उपाध्यक्ष च्या वतीने करण्यात आली यावेळी टिंकू दुधे युवासेना शहर प्रमुख मुल, चेतन मेकर्तीवार, सतिश वैरागडवार, दिवाकर झरकर, शुभम मुत्यलवार, मुन्ना कावळे, आकाश निकुरे, गणेश मंथनवार आकाश मोहुर्ले,ज्ञानेश्वर मडावी, शिवप्रेमी उपस्थित होते. 🚩🚩🚩🚩

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!