गोसीखुर्द कालव्यात पडलेल्या दोन रानगव्यांना जीवदान, स्वाब संस्था व वन विभागाची यशस्वी मोहीम.



तळोधी (बा.)
                ब्रम्हपुरी वन विभाग ब्रम्हपुरी अंतर्गत येणाऱ्या तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्रातील आलेवाही बिटातील कक्ष क्रमांक ७०३ गंगासागर हेटी आलेवाही परिसरातून जाणाऱ्या गोसीखुर्द कालव्यात पडलेल्या एक नर आणि मादी अंदाजे चार ते पाच वर्षे वयाच्या तरुण दोन रानगव्यांना वन विभाग व स्वाब संस्थेच्या वतीने जीवदान देण्यात आले.
   सविस्तर वृत्त उश्राळा (मेंढा) खरकाळा परिसरातील गोसीखुर्द कालव्यामध्ये एक दोन रानगव्यांना पडले असल्याचे शेतकऱ्यांना निदर्शनास येताच त्या संदर्भात माहिती स्वाब संस्थेला व वन विभागाला कळविण्यात आली. वन कर्मचारी सह स्वाब बचाव दलाने घटनास्थळ गाठले. 
 उपवन संरक्षक  कुमार स्वामी वन विभाग ब्रह्मपुरी यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात, सहाय्यक वन संरक्षक महेश गायकवाड, प्रशिक्षणार्थी सहाय्यक वन संरक्षक अरविंद जे., बायलाजीस्ट राकेश आहुजा, प्रशिक्षणार्थी वनपरिक्षेत्र अधिकारी पवार यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले,व स्वाब बचाव दल व वन कर्मचारी वनमजूर यांच्या सहाय्याने कालव्यात पडलेल्या दोन रानगव्यांना कालव्यातून सुरक्षित बाहेर काढले.  हा बचाव कार्य दुपारी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत ९ तास चालला. यानंतर पाण्याच्या व कालव्याच्या वर काढल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ कुंदन पोचलवार, (ताडोबा व्याघ्र प्रकल्प)यांच्याद्वारे गुंगीचे इंजेक्शन  देऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली व नंतर दोन रानगव्यांना मोकळे करण्यात आले. त्यानंतर त्या दोन रानगव्यांनी जंगलाच्या दिशेने  धूम ठोकली. अशाप्रकारे सुरक्षितपणे कालव्याच्या बाहेर काढून दोन रानगव्यांना जीवदान देण्यात आले.
   यावेळी स्वाब से बचाव दल प्रमुख जीवेस सयाम,  स्वाब चे यश कायरकर, गोपाल कुंभले, नितीन भेंडाळे, गणेश गुरनुले, आदित्य नान्हे, स्वराज मोहुर्ले, गणेश गावतुरे,  शुभम निकेशर, सुरज नेवारे, यांनी दोर व जाळे टाकुन व्यवस्थित पकडले.   यावेळी वन विभाग तळोधीचे क्षेत्र सहाय्यक अरविंद माने, वनरक्षक राजेंद्र भरणे, वनरक्षक पंडित मेकेवाड, सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील वनरक्षक सचिन चौधरी, व संपूर्ण आर.आर.यु. टीम व वनमजूर उपस्थित होते.               
"या कालव्यावरून वन्यजीवांना ये जा करण्याकरिता जागोजागी काही अंतरावर पूल व कालव्यातून चढण्याकरता पायऱ्या बनवणे गरजेचे आहे. वारंवार या घटना घडत असून याबद्दल प्रसार माध्यमाद्वारे वारंवार लिहिल्या जात आहे. मात्र प्रशासन व गोसीखुर्द बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने वन्यजीवांची मोठी जीवित हानी टाळता येणार नाही. याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे." - यश कायरकर, वन्यजीव प्रेमी व अध्यक्ष 'स्वाब फाउंडेशन'.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!