भोजराज नवघडे यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार जाहीर




नागभीड - मागील अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात व
समाजसेवेची आवड असणारे  दैनिक सकाळ वृतपत्राचे तालूका प्रतिनिधी भोजराज केवळराम नवघडे  रा. पारडी, तालूका नागभीड जिल्हा चंद्रपूर यांना नुकताच भारत सरकार आणि निती आयोग नोंदणीकृत ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षक समिती 'तर्फे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार २०२६ साठी नुकतीच निवड करण्यात आली असून याचबरोबर चंद्रपूर जिल्हा सचिव पदाची जबाबदारी पार पाडावी म्हणून भोजराज नवघडे यांची चंद्रपूर जिल्हा सचिव या पदावर निवड करण्यात आली आहे.
हि निवड ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. सौ. आशाताई पाटील नाशिक यांनी केली असून तशा प्रकारचे निवड पत्र भोजराज नवघडे यांना प्राप्त झाले आहे. त्यांना हा सन्मान दि.०८ फेब्रुवारी २०२६ रोजी सेलिब्रिटी हॉटेल अंध शाळा बस स्टॉप समर्थ बाजार जवळ नाशिक रोड नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे.
या पुरस्कार सोहळ्यात मा. श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक, सौ, सीमाताई महेश हिरे आमदार,सौ. देवयानीताई फरांदे आमदार, कल्याणराव पाटील आमदार, मनोरमा पाटील समाजसेविका, संदीप सोनवणे कडकनाथ ऍग्रो वर्ल्ड संस्थापक,अजय बोरस्ते शिवसेना उपनेता नगरसेवक,सुधीर तांबे माजी विधानपरिषद सदस्य, महेश चौधरी अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त नाशिक, मंदाकिनी भोसले ग्राहक तक्रार निवारण आयोग अध्यक्ष नाशिक,अनिल गिरनारे वैध मापन शास्त्र, उपनिबंधक नाशिक, डॉ यु. के.शर्मा पर्यावरण तज्ञ या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्काराने मिळाल्याबद्दल नागभीड तालुक्यातील पत्रकार व अनेक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!