सिमेंट चोरी प्रकरणी एकाला अटक वरोरा पोलिसांची कारवाई
वरोरा....जगदीश पेंदाम
येथील वणी बायपास रोड लगत असलेल्या उडाण पुलाजवळ रेल्वेच्या बांधकामासाठी आणलेल्या सिमेंट बॅगा एकूण 85 पोते त्याची एकूण किंमत 29 हजार रुपये किंमतीची सिमेंट अज्ञात आरोपीने रात्रीच पिकअप वाहनाने चोरून नेल्याचे उघडकीस आले.
याबाबत दिनांक १/२/२०२६ रोजी राहुल कुमार नुनबाबु रजत धंदा खाजगी नोकरी,मु रुपनगर बिहार यांनी फिर्याद दिली होती तक्रारी च्या आधारावर वरोरा पोलिसांनी तपासचक्रे फिरवत गोपनीय माहितीच्या आधारे व सीसीटीव्ही फुटेज च्या आधारावर कालीदास वाकडे वय ४२ वर्ष राहणार टेमुर्डा येथील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचे कडील चारचाकी बोलेरो पिकप वाहन त्याची किंमत ४०००००/- चार लाख रुपये व 85 पोते सिमेंट बॅग त्याची किंमत ३०००० तिस हजार रुपये असा एकूण ४३००००/-चार लाख तिस हजार रुपये एवढा मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपीला अटक केली आहे हि कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिंक्य तांबडे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद एस भस्मे ,पोलीस हवालदार संदीप मुळे ,पोलीस कॉन्स्टेबल विशाल राजूरकर, पोलिस अमलदार सौरभ कुलथे ,पोलीस हवालदार सुकराज यादव,पोलीस हवालदार नवघरे यांनी केली आहे...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!