राज्यात मोठी खळबळ..! 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना अटक

राज्यात मोठी खळबळ..! 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना अटक


राजकारणात, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली माणूस हरलाजालना जिल्ह्यात 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याने खळबळ उडाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने 31 आरोपींना अटक केली असून त्यात 22 तलाठी, 5 तहसील कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी आणि संगणक तज्ज्ञांचा समावेश आहे.

अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नावावरचे अनुदान बनावट लाभार्थ्यांच्या खात्यावर वळवण्यात आले. एक गुंठाही जमीन नसलेल्या व्यक्तींची नावे लाभार्थी यादीत टाकून 24 कोटी 90 लाखांहून अधिक रकमेचा अपहार करण्यात आला.

तहसीलदारांचे लॉगिन व पासवर्ड वापरून प्रणालीत फेरफार केल्याचे उघड झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल झाला. न्यायालयाने आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले. आरोपींची बँक खाती सील, मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू आहे. चार आरोपी फरार असून तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!