ओ.बी.सी. समाजाची जातनिहाय जनगणना करा - सावलीत काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण



सावली - सावली तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे या प्रमुख मागणीसाठीगुरुवारी सावली तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून शासनाचे मागणीकडे लक्ष वेधले.

        यावेळी सावली तहसील प्रशासनाच्या माध्यमातून भारत सरकार व संबंधित मंत्रालयात ओ.बी.सी. समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या प्रमुख मागणीला घेऊन निवेदन देण्यात आले. केंद्र सरकार जनगणना करण्याची तयारी करीत असून भारत सरकारच्या राजपत्रात, २०२७ मध्ये घरांची यादी आणि घरांच्या गणनेसाठी सर्व व्यक्तींना प्रश्न विचारण्यासाठी ३३ प्रश्नांची यादी तयार करण्यात आली आहे, १२ व्या प्रश्न यादीमध्ये, कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीचा आहे की नाही आणि इतर संबंधित माहिती विचारण्यात आली आहे, परंतु त्यात इतर मागासवर्गीय (ओबीसी) यांचा उल्लेख केलेला नाही. ३० एप्रिल २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, जात-आधारित जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्याची माहिती प्रेस मीडियाला दिली होती, परंतु २२ जानेवारी २०२६ च्या राजपत्रात इतर मागासवर्गीय (ओबीसी) वर्गाचा स्पष्ट उल्लेख नसल्याने समाजात संभ्रम निर्माण झाला आहे, सरकारच्या हेतूबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत, त्यामुळे मागासवर्गीय वर्गाचे नवीन राजपत्र काढून हा गोंधळ दूर करण्याची मागणी करण्यात आली.

       लाक्षणिक उपोषणाला सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन गोहने, महिला तालुका अध्यक्षा उषा भोयर, नगराध्यक्ष साधना वाढई, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर कारडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सावलीचे सभापती राजू पाटील ठाकरे, माजी सभापती राकेश गड्डमवार, माजी सभापती  विजय कोरेवार, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार, माजी नगराध्यक्ष लता लाकडे, आशिष मनबतुलवार,  कृषी.उ.बा.संचालक नरेश सुरमवार, सुनील बोमनवार, खुशाल लोडे, अनिल मशाखेत्रि, सुनिल पाल,  टिकाराम रोहनकर, दिलीप लटारे, विजय गड्डमवार, डोमाजी शेंडे, प्रकाश घोटेकर, दिवाकर काचिनवार, अनिल गुरुनुले, दिपक जवादे, प्रमोद खोबे, चंद्रकांत संतोषवार, नगरसेवक सचिन संगीडवार, प्रीतम गेडाम, गुणवंत सुरमवार, नितेश रस्से, नगरसेविका ज्योती शिंदे, सीमा संतोषवार,  श्रीकांत बहिरवार, राकेश घोटेकर, संदीप सायत्रावार, रोशन बोरकर, भाऊराव कोठारे,प्रल्हाद भोयर ,प्रवीण गेडाम, कुणाल मालवणकर, आकाश कोरडे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!