विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या पवनी तालुक्यात रेती चोरट्यांचा धुमाकूळ

महसूल व पोलीस प्रशासन सुस्त का..?

स्थानिक आमदारांचेही दुर्लक्ष 

महसूल मंत्री कठोर कारवाई चे निर्देश का देत नाहीत..?

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - भंडारा जिल्ह्यातील पवनी हि विदर्भाची काशी म्हणून जगप्रसिद्ध आहे. वैनगंगा नदी हि प्रामुख्याने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांतून वाहते. महाराष्ट्रात ती मुख्यत्वे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या ५ प्रमुख जिल्ह्यांतून वाहते, तर मध्य प्रदेशातील शिवनी आणि बालाघाट जिल्ह्यांत तिचा उगम स्थान व सुरुवातीचा प्रवाह आहे. मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील महादेव टेकड्यातुन या नदीचा उगम झालेला दिसून येते.
व भंडारा जिल्ह्यापासून ती महाराष्ट्रात प्रवेश करून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतून वाहते. तसेच या नदीचा संगम चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर, वैनगंगा आणि वर्धा नदीचा संगम होऊन ती 'प्राणहिता' नदी तयार होते, जी पुढे गोदावरी नदीला मिळते. आणि या नदीचे महत्व म्हणजेच ही विदर्भातील एकमेव प्रमुख नदी असून, प्रामुख्याने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात या वैनगंगा नदीचा वापर शेतीसाठी (भातशेती) सिंचनाचा मुख्य स्त्रोत आहे. याच नदीवर गोसेखुर्द धरण (इंदिरा सागर प्रकल्प) तयार करण्यात आले.हे धरण भंडारा जिल्ह्यातील पवनी वरून १२ किमी अंतरावर गोसे या गावी आहे. व वैनगंगा नदीवर बांधलेला हा एक प्रमुख राष्ट्रीय सिंचन प्रकल्प आहे. २३ ऑक्टोबर १९८४ रोजी पायाभरणी झालेले हे धरण ९२ मीटर उंच आणि सुमारे ६५३ मीटर लांब असून, विदर्भातील भंडारा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यांतील सिंचनासाठी हे धरण वरदान ठरत आहे.हे धरण ३८ वर्षांहून अधिक काळ संघर्ष आणि कामाच्या प्रगतीनंतर, जानेवारी २०२२ मध्ये पहिल्यांदाच १०० टक्के भरले होते.व यामुळे या प्रकल्पासाठी अनेक गावांतील लोकांचे पुनर्वसन सुद्धा करण्यात आले आहे. याच धरणावर खाजगीकरणांतर्गत दोन जलविद्युत प्रकल्पही उभारण्यात आले आहेत.तसेच या नदीचा होणारा फायदा म्हणजेच शेतकऱ्यांच्या रब्बी आणि खरीप हंगामात शेकडो हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळतो.परंतु गोसे या प्रकल्पात धरणाचे पाणी अडवून ठेवल्याने पवनी तालुक्यात वैनगंगा नदीचे पात्र मोठया प्रमाणावर कोरडे आणि रेताळ भाग बघायला मिळत असते. यामुळेच नदी लगत असलेल्या गावामध्ये अनेकांकडे हायवा ट्रक, ट्रॅक्टर, बघायला मिळते व यांचा वापर रेती चोरीसाठी केला जातो.यामध्ये सर्वात जास्त चोरटा उपक्रम खातखेडा,गुडेगाव,जुनोना, पवनी, याठिकाणी केला आहे. तहसीलदार सतीश साळवे. खातखेडा गुडेगाव जुनोना येथील मंडळ अधिकारी मीरा शेंडे तलाठी विशाल जाधव व जुनोना मंडळ अधिकारी मसराम मंडळ अधिकारी व त्यांचे सहकार्याणे तलाठी अवैध वाहतूक आणि चोरीला का आळा अधिकारी घालत नाही म्हणजेच इथं देवाण-घेवाण करून मोठ - मोठे अवैधरित्या वाहतूक तहसीलदार यांच्या आशिर्वादाने चालत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!