नगराध्यक्षा विजयाताई नंदूरकर यांनी नगर परिषदेत भरवीला जनता दरबार
जनतेच्या ऐकून घेतल्या समस्या
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दिनांक 27/02/2026 ला विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवनी शहरांमध्ये सर्व प्रथमच नगराध्यक्षा विजयाताई नंदुरकर यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार भरविण्यात आले.लोकांच्या समस्यांचे निराकरण करणे हेच प्रमुख उद्दिष्ट या जनता दरबाराचे होते. कारण बऱ्याचशा वर्षापासून पवनी नगरातील जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी नगरपरिषद कार्यालय येथे जनता दरबाराचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जवळपास प्रत्येकी तासाला 50 ते 100 लोकांचे लेखी स्वरूपाचे पत्र देऊन त्यावर त्यांचे म्हणणे ऐकून त्या पत्राला रिमार्क करून संबंधित घटनास्थळी जाऊन समस्या बघून समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासन पवनी नगर परिषदेच्या अध्यक्षा विजया नंदुरकर मुख्याधिकारी इंगोले तसेच सर्व नगरपरिषद मध्ये पवनी नगरातील जनतेने निवडून दिलेले पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. जनता दरबारामुळे लोकांना आपापले मत व्यक्त करण्याचा अधिकार यावेळी मिळाला याची सर्वत्र चर्चा रंगली असून या कार्यक्रमाची नगरवासीय जनतेकडून कौतुक केले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!