वाघीण पकडण्यात वन विभागाला यश* (तळोधी वनपरिक्षेत्रात बाळापुर परिसरात लोकांमध्ये पसरवली होती दहशत.)

*वाघीण पकडण्यात वन विभागाला यश* 
(तळोधी वनपरिक्षेत्रात बाळापुर परिसरात लोकांमध्ये पसरवली होती दहशत.)
यश कायरकर:
      ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या  तळोधी वनपरिक्षेत्रातील तळोधी उपक्षेत्रातील मौजा बाळापुर, येनोली कोट. येथे मागील 15ौँंंंंध् दिवसापासून गावानजीक व शेतशिवार परिसरातून भटकून शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना मारणारी व मानवी जिवीतास धोकादायक ठरलेल्या T-139_SAF (मादी) वय अंदाजे 20 महिण्याचा वाघीणीस आज दिनांक 28/02/2026 रोजी सकाळी 11.35 वाजता मौजा बाळापुर कक्ष क्रमांक 168 (संरक्षीत वन) मध्ये  (मादी) वाघीणीस बेशुध्द करून जेरबंद करण्यात आले. 
   सदर कार्यवाही मा. श्री. कुमारस्वामी एस. आर, उपवनसंरक्षक, ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनाखाली श्री एम. बी. गायकवाड सहायक वनसंरक्षक (तेंदू) ब्रम्हपुरी वनविभाग, मा. अरविंद जे, सहाय्यक वनसंरक्षक (प्रादे. व वन्यजीव), ब्रम्हपुरी वनविभाग, श्री. ए. आर. कन्नमवार, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) तळोधी, श्री. ए. जी. मने, क्षेत्र सहाय्यक तळोधी व इतर क्षेत्रिय वन कर्मचारी तसेच डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकिय अधिकारी, श्री अजय मराठे, पोलीस हवालदार (शुटर) व त्यांची चमु RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, श्री राकेश आहुजा, बायोलॉजिस्ट यांचे उपस्थितीत पार पडली.
     सदर जेरबंद T-139_SAF (मादी) वाघीणीस डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकिय अधिकारी, RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांचेकडून वैद्यकिय तपासणी करण्यात आली असुन पशुवैद्यकिय अधिकारी यांनी जेरबंद वाघीण तंदुरुस्त असल्याचे वैद्यकिय प्रमाणपत्र सादर केलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!