अतिवूष्टी च्या अनुदानाची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा

प्रहार जिल्हा प्रमुख शेरखान पठान यांचे चिमुर तहसीलदारांना निवेदन

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - चिमुर तालूक्यातिल काही शेतकरी अनुजनापासून वंचित राहीलेले आहे, शेतकरी वारंवार तहसील कार्यालयात चक्रा मारुन सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही, शेतकरी या त्रासाला कंटाळून, शेतकर्यांनी प्रहार जनशक्ति पक्षा चे जिल्हा प्रमुख शेरखान पठान, यांच्या कडे आपली समस्या सांगीतली, शेरखान पठान यानी शेतकर्यांना घेऊन तहसील कार्यालय चिमुर  गाठले यावेळी यांनी विचारपूस केली असता, अशी माहीती लक्षात आली की, तहसील कार्यालयाच्या यादीत शेतकर्यांचे पैसे जमा झालेले आहे, असून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झालेले नाही, ही बाब लक्षात येताच शेरखान पठान यांनी तहसीलदार यांना सांगीतले ,जर आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही, तर परिसरातील शेतकऱ्यांना घेऊन आपल्या कार्यालयात, आगळे वेगळे आंदोलन करन्यात येईल, यावर तहसीलदार यांनी शेरखान पठान यांना सांगीतले की, काही तांत्रिक अळचनी येत असल्याने उशिर हो असुन अतिवूष्टी चे अनूदान लवकरात लवकर जमा करन्याचे प्रयत्न करू,  या वेळी उपस्थित शेतकरी, तुषार सतिकोसरे,राजू चौखे,अनिल दडमल,संदीप जांभूळकार, विठ्ठल जांभूळकार, आनंदराव पाटील, शंकर उईके, ज्ञानेश्वर डाहूले,भारत कुळमेथे, परिसरातील मोठ्या संखेने शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!