रॉयल्टी काढून मुरमाचे खोदकाम, परंतु कायदा व सुव्यवस्था धाब्यावर

तहसीलदार व उपविभागीय अधिकारी चिमूर यांचे दुर्लक्ष, तक्रारदारालाच यांची दमदाटी 

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - भिसी पासून ३ कि.मी.अंतरावर असलेल्या पुयारदंड गावाजवळील कन्हाळगाव ब्राम्हण शेत शिवारातून मागील काही दिवसापासून  रॉयल्टी काढून मुरुमाचे उत्खनन चालू आहे यामध्ये शासन नियमानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधिल नियम ४८ (७)  व नियम ७९ चे सर्रास उल्लघन होत असल्याची मा. तह्शीलदार चिमूर यांचे कडे २३/०१/२०२६ ला लेखी तर  व SDM घाडगे यांना तोंडी तक्रार करण्यात आली.
                परंतु आजपावेतो तह्शीलदार राजमाने व SDM घाडगे यांनी कोणतीही  कारवाई न करता उलट तक्रारदारालाच दमदाटी केल्याने तक्रार दराने .SDM व तह्शीलदार यांची तक्रार जिल्हाधिकारी यांचे दालनात ३०/०१/२०२६ रोजी  केली. सदर गौण खनिज मुरुमाच्या उत्खाना साठी M/S Sarala-MKS JV यांनी १४  /०१/२०२६ ला रॉयल्टी साठी अर्ज करून   १४ ते २२ जाने.२०२६ व दुसरा अर्ज२२/०१/२०२६ रोजी करून  २२ ते २९ जाने २०२६ पर्यंत रॉयल्टी काढून घेतली या रॉयल्टी च्या नावाखाली रात्र –दिवस उत्खनन करून अधिक वाहनाचा वापर करून या गौण खनिजाची  वाहतूक नियमबाह्य केली. नियम आहे खाणकाम सूर्योदयापासून ते सूर्यास्ता पर्यंत करणेचे आहे ठरवून दिलेल्या वेळेपूर्वी अथवा वेळेनंतर खाणकाम केलेचे आढळून आलेस संबंधितावर नियम ७९ नुसार कारवाई केले जाईल.कोणतेही खनिज सांडू नये किव्हा त्याची धूळ उडू नये यासाठी ट्रक किव्हा ट्रकटर्स ताडपत्रीने किव्हा योग्य अशा इतर साधनाने झाकून गौन्खानिजाची वाहतूक करावी.परवानाधारकाने सदर आदेशात नमूद केलेल्या वाहनाच्या व्यतिरिक्त इतर वाहनाने गौण खनिज वाहतूक केल्याचे आढळून आल्यास सदर खनिज वाह्युक अनधिकृत समजून महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ मधील नियम ४८(७) नुसार परवानाधारक करविस पात्र राहील. 
             या नियमांना बगल देत सर्रास मे.सरला एम के एस JV या कंपनीने  रात्रंदिवस गौण खनिजाची उत्खनन व वाहतूक करून  महसूल विभागाची फसवणूक केली पुयारदंड गाव वाशीयांना रात्रंदिवस धूळ चारली  याची तक्रार महसूल विभागाच्या अधिकार्यांकडे करूनही सादर कंपनी वर कोणतीही कारवाई झाली नाही. तर तक्रार दाराच्या तक्रारीला केराची टोपली दाखवीत  पुन्हा याच कंपनीला दि.०५/०२/२०२६ ते ०८ ०२/२०२६ पर्यंत रात्रंदिवस उत्खननाची  रॉयल्टी देऊन तह्शीलदार व SDM आपले खिसे गरम करून घेत शासनाचा महसूल बुडवीत असल्याचे समजून येत आहे.


==================================
कायद्या धाब्यावर बसवून चालू असलेल्या गौण खनिज मुरूमाची अवैध वाहतुकीबद्दल तहसीलदार राजमाने यांना माहिती 21 जाणे 2026 रात्री 11.05 ला दिली परंतु  कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे 23/01/26 ला लेखी तक्रार केली.त्या तक्रारीची दखल न घेता SDM घाडगे यांनी मलाच दमदाटी केली.
यावरून मुरूम चोरट्या सोबत यांचे घनिष्ठ संबंध असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे  तहसीलदार व sdm यांची 30/01/26 ला जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार करण्यात आली.
राजेंद्र डी.जाधव 
उपतालुका प्रमुख, चिमूर शिवसेना (उबाठा )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!