सावली तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध - विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार सावली तालुक्यात ४ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
सावली तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध - विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार
सावली तालुक्यात ४ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
सावली - तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन विधिमंडळ पक्षनेते तथा ब्रह्मपुरी मतदारसंघाचे आमदार आ. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. या कामांमुळे तालुक्यातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा मजबूत होणार असून ग्रामीण भागाच्या विकासाला नवी गती मिळणार आहे.
या प्रसंगी विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, “सावली तालुक्याचा सर्वांगीण विकास हा माझा ध्यास आहे. नागरिकांना रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. या विकास कामांमुळे गावागावांतील लोकांचे जीवनमान उंचावेल.
भूमिपूजन करण्यात आलेल्या कामांमध्ये सावली तालुक्यातील चांदली बुज. येथे खनिज निधी अंतर्गत आर. ओ. प्लांटचे भूमिपूजन (अंदाजित किंमत १७ लक्ष), सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन (२० लक्ष), मानकापूर येथे रस्ता दुरुस्ती व डांबरीकरण (७५ लक्ष), चेक मानकापूर येथे जि. प. शाळा इमारतीचे भूमिपूजन, पांढरसराड येथे लघु पाटबंधारे तलावाचे कामाचे भूमिपूजन (९०.४० लक्ष), उसेगाव येथे आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण (५५.५० लक्ष), जीबगाव येथे पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे लोकार्पण (५० लक्ष), जिल्हा परिषद शाळा नवीन इमारतीचे लोकार्पण (५० लक्ष), प्रवासी निवारा लोकार्पण, (१० लक्ष ),मोखाळा येथे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण (३० लक्ष) या विकासकामांचा समावेश आहे.
आयोजित भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यास सावली तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहणे, महिला आघाडी अध्यक्षा उषा भोयर, माजी सभापती विजय कोरेवार, कृष्णा राऊत, विजय मुत्यालवार, सचिन संगीडवार, आशिष मनबत्तुलवार, किशोर कारडे, पुरुषोत्तम चुधरी, शीला गुरणुले, यांचेसह स्थानिक पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विकास कामांबद्दल समाधान व्यक्त करत आ. वडेट्टीवार यांचे आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!