गोसीखुर्द कालव्यात पडलेल्या निलगायला जीवदान, स्वाब संस्था व वन विभागाची यशस्वी मोहीम.
(आज पर्यंत स्वाब संस्थेद्वारे या कालव्यामधून चार नीलगाय, आठ चितळे, सांबर, दोन रानगवे, व कित्येक जंगली डुकरांना व गाई- बैलांना रेस्क्यू करून देण्यात आले जीवदान.)
तळोधी (बा.)
ब्रम्हपुरी वन विभाग ब्रम्हपुरी अंतर्गत येणाऱ्या तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्रातील गंगासागर हेटी उसाळा मेंढा परिसरातून जाणाऱ्या गोसीखुर्द कालव्यात पडलेल्या निलगायला वन विभाग व स्वाब संस्थेच्या वतीने जीवदान देण्यात आले.
सविस्तर वृत्त आकापुर - गंगासागर हेटी -उश्राळा (मेंढा) परिसरातील गोसीखुर्द कालव्यामध्ये एक नर नीलगाय अंदाजे दोन ते अडीच वर्षे वयाचे पडले असल्याचे शेतकऱ्यांना निदर्शनास येताच त्या संदर्भात माहिती स्वाब संस्थेला व वन विभागाला कळविण्यात आली. वनपरिक्षेत्र अंजली सायंकार/ बोरावार यांच्या मार्गदर्शनात वन कर्मचारी सह स्वाब बचाव दलाने घटनास्थळ गाठले. व कालव्यात पडलेली अंदाजे अंदाजे दोन ते अडीच वर्षे वयाचा नर निलगायला कालव्याच्या पाण्यामध्ये उतरून व्यवस्थित बाहेर काढले. हा बचाव कार्य सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत चालला. यानंतर पाण्याच्या व कालव्याच्या वर काढल्यानंतर निघायला जंगलात नेऊन पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याद्वारे मलमपट्टी व इंजेक्शन देऊन मोकळी करण्यात आले त्यानंतर त्या निलगायाने जंगलाच्या दिशेने नीलगायने धूम ठोकला. अशाप्रकारे सुरक्षितपणे कालव्याच्या बाहेर काढून निलगाय ला जीवदान देण्यात आले.
यावेळी स्वाब से बचाव दल प्रमुख जीवेस सयाम, स्वाब चे यश कायरकर, नितीन भेंडाळे, गणेश गुरनुले, जीवन आदित्य नान्हे, स्वराज मोहुर्ले, गणेश गावतुरे, शुभम निकेशर, यांनी कालव्यात उतरून निघायला दोर व जाळे टाकुन व्यवस्थित पकडले. यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ईशा आकरे मॅडम तळोधी यांच्या द्वारे चिकित्सा करून इंजेक्शन व मरणपट्टी करून निलगायला जंगलात सुरक्षित सोडण्यात आले. यावेळी वन विभाग तळोदीचे क्षेत्र सहाय्यक अरविंद माने, आकापूरचे वनरक्षक राजेंद्र भरणे, व वनमजूर उपस्थित होते.
"या कालव्यावरून वन्यजीवांना ये जा करण्याकरिता जागोजागी काही अंतरावर पूल व कालव्यातून चढण्याकरता पायऱ्या बनवणे गरजेचे आहे. वारंवार या घटना घडत असून याबद्दल प्रसार माध्यमाद्वारे वारंवार लिहिल्या जात आहे. मात्र प्रशासन व गोसीखुर्द बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने वन्यजीवांची मोठी जीवित हानी टाळता येणार नाही. याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे." - यश कायरकर, वन्यजीव प्रेमी व अध्यक्ष 'स्वाब फाउंडेशन'.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!