माजी विद्यार्थ्यांचे यश बगुन शिक्षकांचे आनंदाश्रू अनावर
नेहरू विद्यालय शेगाव बु येथे माजी विद्यार्थी व शिक्षक यांचा स्नेहमीलन सोहळा संपन
वरोरा....जगदीश पेंदाम
शेगाव बु मधील नेहरू विद्यालय तथा कानिष्ठ महाविद्यालय यांचा माजी विद्यार्थी तथा माजी शिक्षक स्नेहमीलनं सोहळा साजरा करण्यात आला.
यामध्ये शाळा स्थापना झाल्या पासून तर आज पर्यंत शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या सर्व माजी विद्यार्थी यांना आमंत्रित करण्यात आले होते. सुरुवातीला येणाऱ्या सर्व विद्यार्थी यांची नोंदणी करण्यात आली त्या नंतर त्याना नास्ता चहाची व्यवस्था करण्यात आली होती. त्या नंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आलेल्या समस्त माजी गुरुजणांचे शाल श्रीफळ व पुषगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्या नंतर सगळ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात आकर्षण म्हणेज एका 7 विच्या चिमुकलीने महात्मा जोतिबा फुले यांच्यावर गायलेले गाणं यांनी सगळ्यांना मोहून सोडले ज्या साठी तिला सगळ्यांनी मिळून 5200 रुपयाचे पुरस्कार सुद्धा देण्यात आले. त्या नंतर सगळ्यांना जेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती व नंतर सगळ्यांनी एकमेकांशी मनमोकळे पणाने गप्पा मारून मस्त डीजे च्या तालावर डान्स केला व कार्यकमाची सांगता करण्यात आली.
एक दिवसासाठी का होईना पण सगळे वर्ग मित्र परत एकदा एकत्र आल्या मुळे सगळ्यांनाच पुन्हा एकदा हा शाळेतील दिवस अनुभवता आला. या कार्यकमाचे आयोजन हे नेहरू विद्यालय तथा कानिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य बालाजी ढाकूणकर यांनी केले होते तर शाळेचे माजी विद्यार्थी मनोज बोन्दगुलवार व सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी या कार्यकम यशस्वी होण्या साठी अथक परिश्रम घेतले..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!