पहिल्या सभेआधीच काँग्रेसमध्ये फटाके! मूल नगरपालिकेत स्वीकृत सदस्यांवरून नाराजीचा सूर

पठाण–गुरनुले स्वीकृत सदस्य?
मूल नगरपालिकेत काँग्रेसच्या गोटात नाराजीचे वादळ


गेल्या दहा वर्षांपासून मूल नगरपरिषदेत भाजपची सत्ता अबाधित होती. त्यानंतर साडेचार वर्षांचा प्रशासक राज संपल्यानंतर २ डिसेंबरला  झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा दमदार मुसंडी मारत नगराध्यक्षांसह 18 नगरसेवक निवडून आणले. मात्र सत्तास्थापनेनंतर अवघ्या काही आठवड्यांतच पक्षांतर्गत नाराजीचे सावट गडद होताना दिसत आहे.

7 जानेवारी रोजी होणाऱ्या मूल नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष आणि दोन स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस गटनेते राकेश रत्नावार यांनी गुलाब पठाण आणि बंडू गुरनुले यांच्या नावाची शिफारस केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
गुलाब पठाण अथवा बंडू गुरूनुले नावावरून सदस्यात विरोध नाही मात्र कुणालाही विश्वासघात न घेता, नगरसेवकाची बैठक घेऊन त्यांची संमती न घेताच, आपले निर्णय लादण्याचा प्रकार नवनिर्वाचित नगरसेवकाच्या जिव्हारी लागत असल्याची चर्चा आहे

20 सदस्यीय नगरपालिकेत काँग्रेसचे 18 तर भाजपाचे केवळ 2 नगरसेवक निवडून आले आहेत. बहुमताच्या जोरावर स्वीकृत सदस्यपद काँग्रेसकडे जाणे निश्चित असले, तरी स्वीकृत सदस्य कोण? या प्रश्नावरूनच पक्षाअंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. अनेक दिवसांपासून स्वीकृत सदस्यपदाचे स्वप्न पाहणारे ज्येष्ठ व निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते डावलले जात असल्याची भावना आता उघडपणे व्यक्त होत आहे.

दरम्यान, माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार यांनी एका पत्रकाराशी बोलताना नाराजीचा सूर अधिक ठळक केला.
“नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणण्यासाठी मी दिवसरात्र मेहनत घेतली. 21 डिसेंबर च्या निकालानंतर काँग्रेसचे 18 नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून आले. जनमानसात माझ्या नावाची चर्चा होती, मात्र स्वीकृत सदस्य कोण होणार याची मला अद्याप कोणतीही माहिती नाही,” अशी स्पष्ट प्रतिक्रिया त्यांनी दिली.

धक्कादायक बाब म्हणजे स्वीकृत सदस्यांच्या निवडीबाबत नगरसेवकांची मतेही विचारात घेतली गेली नसल्याचे समोर येत आहे. नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीआधी ‘फटाके’ फुटू लागल्याने काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

या घडामोडींनंतर काही वरिष्ठ निर्वाचित नगरसेवकांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठांनी आता सावरासावर भूमिका घेतल्याचे संकेत मिळत आहेत.
मात्र स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सुरू झालेला हा वाद काँग्रेससाठी आताच डोकेदुखी ठरणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
मुल शहरातील सत्ता परिवर्तनाचे किंग मेकर प्रशांत समर्थ यांनी निवडणुकीच्या दरम्यान काहीना स्विकृतीचे शब्द दिले होते, मात्र त्यांना किंवा नगराध्यक्ष एकता प्रशांत समर्थ यांना विश्वासात न घेताच परस्पर गटनेते राकेश रत्नावार यांनी हा निर्णय घेतल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!