विहिरीत मादी बिबट आढळला मृतावस्थेत कोथुळना येथील शेतशिवारातील घटना

विहिरीत मादी बिबट आढळला मृतावस्थेत

कोथुळना येथील शेतशिवारातील घटना


नागभीड, (ता. प्र.). शेताती विहिरीत मादी बिबट मृतावस्थेत आढळून आला. ही घटना नागभीड तालुक्यातील कोथुळना येथील शेतशिवारात सोमवारी (दि. ५) सकाळच्या सुमारास उघडीस आली. बाळकृष्ण रामटेके यांच्या शेतातील विहिरीजवळ वायरमॅन बुधाराम मडावी हे विद्युत खांब पाहण्यासाठी गेले असता निदर्शनास आली.

वायरमन बुधाराम मडावी हे विद्युत खांब पाहण्यासाठी सोमवारी सकाळी गेले असता त्यांना विहिरीतून दुर्गंधी येत होती. त्याने विहिरीत काहीतरी असेल म्हणून डोकावून बघितले असता विहिरीत बिबट पडलेला दिसला. या घटनेची तत्काळ माहिती वनविभागाला देण्यात आली. वन विभागाची चमू कोठूळणा येथे दाखल होऊन मृतक बिबट्याला विहिरी बाहेर काढण्यात आले. बिबट बिबट हा अंदाजे दीड वर्षांचा असावा, असे वनविभागाने सांगितले. शिकारीचा पाठलाग करताना विहिरीत पडला असावा, अशी माहिती प्राप्त झाली. या बिबट्याला विहिरीतून

वन्यप्राण्याची धाव गावाकडे

दिवसेंदिवस बिबट, वाघ, इतर रानटी प्राण्याचा वावर वाढत चालला आहे, शेतकरी शेतात जाण्यास घाबरतात. परंतु, नाईलाजाने शेतकऱ्यास शेतात जावे लागते. जंगलातील प्राणी गावाकडे धाव घेऊ लागले, परिणामी मानवावरील हल्ले वाढू लागले आहेत आणि जंगली प्राण्यांना सुद्धा आपले जीव गमावावे लागत आहे. अस्यातच शिकरीच्या शोधात कोथूळना येथील शिवारात एका बिबट्याला आपले जीव गमवावे लागले.

बाहेर काढताना आरएफओ भारती बगमारे, तावडे आणी वन विभागाची संपूर्ण टीम उपस्थित होती. तसेच पोलिस पाटील प्रफुल्ल बारसागडे, झेपचे अध्यक्ष पवन नागरे, ओमप्रकाश मेश्राम यांचीही उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!