मुंडाळा गावातील अवैध दारुविक्री बंद करा - पाथरी पोलीस स्टेशनकडे गावाकऱ्यांची मागणी
सावली - पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत मुंडाळा गावात अवैध दारुविक्री मोठ्या प्रमाणात सुरु असून दारुविक्री बंद करण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.
पाथरी ठाण्यापासून ३ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुंडाळा गावात अनेक अवैध दारुविक्रेते आहेत.
दारुविक्री सुरु असल्याने मजूर, युवक दारूच्या आहारी जाऊन भांडण तंटे वाढले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दारुविक्रेत्यांना पाथरी पोलिसांचा अभय असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत. गावात रोजगार हमी योजनेतून १२ हेक्टर जमिनीवर विविध प्रकारच्या फळंझाडांची लागवड केली असून अधिकारी, इतर संस्था भेटी द्यायला येतात मात्र गावात दारू सुरु असल्यामुळे गावाची बदनामी होत असल्याचे गावाकऱ्यांची तक्रार आहे. या दारुविक्रीविरुद्ध ग्रामसभेत ठराव घेण्यात आला. या ठरावाची अंमलबजावणी करण्याची मागणी पोलीस स्टेशन पाथरी येथे शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. यावेळी सरपंच उर्मिला बोरकर , दारूबंदी समिती अध्यक्ष अनिता गेडाम , दारूबंदी समिती उपाध्यक्ष गीता शेंडे, पोलीस पाटील शालिक भरडकर, नंदा सहारे, बंडू कोकोडे, प्रवीण मडावी, विनायक बोरकर , सिबू कोकोडे यांनी निवेदन सादर केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!