नवभारत कन्या विद्यालय मूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

 नवभारत कन्या विद्यालय मूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


शिक्षण प्रसारक मंडळ, मूल द्वारा संचालित नवभारत कन्या विद्यालय, मूल येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ, मूलचे अध्यक्ष अॅड. अनिल वैरागडे उपस्थित होते. संस्थेचे सचिव शशीकांत धर्माधिकारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सदस्य प्रभाकर पुल्लकवार, मुख्याध्यापक अशोक झाडे, मुख्याध्यापिका कु. अल्का वरगंटीवार तसेच ज्येष्ठ शिक्षक दिनेश जिड्डीवार व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत स्वागतगीत व पुष्परोप देऊन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुरेख संचालन कु. उज्वला चहांदे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय सिद्धावार यांनी केले. स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थिनींसाठी विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम व बौद्धिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

दिनांक ३ जानेवारी रोजी स्नेहसंमेलनाचा समारोप कार्यक्रम, बक्षीस वितरण व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संयुक्तरित्या साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ. करूणा बोडखे उपस्थित होत्या. यावेळी गटशिक्षणाधिकारी जयश्री गुज्जनवार, माजी मुख्याध्यापिका सौ. शुभांगीनी वैरागडे तसेच विद्यमान मुख्याध्यापिका कु. अल्का वरगंटीवार उपस्थित होत्या. मंचावर यावेळी ज्येष्ठ शिक्षिका सह अर्चना बेलसरे कु. उज्वला चहांदे सौ जयश्री धोडरे विराजमान होते. मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी “मी सावित्री बोलतेय” या विषयावर विद्यार्थिनींनी प्रभावी एकांकिका सादर केली. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व सामूहिक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन व संचालन विद्यार्थी मंत्रिमंडळाने अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने पार पाडले. स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थिनींच्या कलागुणांना व नेतृत्वगुणांना वाव मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!