कच्चेपार सफारी गेट येथे गाईड मार्गदर्शन कार्यशाळा
सिंदेवाही:
सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत सिंदेवाही तालुक्यात नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या 'कच्चेपार -सिंदबोडी' सफारी गेट वरील गाईड लोकांना मार्गदर्शन व पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी नव्याने सुरू करण्यात आलेल्या कच्चेपार सफारी गेट वरील संपूर्ण गाईड यांना सिंदबोडी तलावाजवळ तसेच गेटवर परिसरात आढळणारे प्राणी, पक्षी, साप, वृक्ष, यांच्या बद्दल विशेष टिप्स देण्यात आल्या.विशेष म्हणजे या परिसरामध्ये प्रसिद्ध 'जय' चा बच्चा बिट्टू वाघ याचे वावर होते. मात्र आता त्याचे वंशज या परिसरामध्ये भटकताना आढळतात. सोबतच अस्वल, बिबट, चांदी अस्वल, सांबर, चितळ , रानगवे यांचे कळपही या परिसरात दिसून येतात.
यानंतर सिंदबोडी तलावाजवळ पक्षी निरीक्षक अभ्यासक रोशन धोत्रे यांच्याद्वारे कैमेरा, दुर्बीण चा वापर करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी स्थानिक पक्षी, प्रवासी पक्षी यांची ओळख त्यांना कसे ओळखायचे, आवाजावरून, दिसण्यावरून त्यांना वेगवेगळे नावं दिलेली आहेत याबद्दल सविस्तर माहिती देऊन "येणाऱ्या पर्यटकांना पर्यटन करत असताना दिसणाऱ्या संपूर्ण पक्षांबद्दल ही माहिती देणे गरजेचे आहे , जरीही कदाचित वाघ दिसला नाही तरी परत जाणाऱ्या पर्यटकाला परिसरा बद्दल माहिती आणि पर्यटनाचा आनंद झाला पाहिजेच" असे सांगितले.
तर त्यानंतर यश कायरकर यांनी सफारी ट्रॅक फिरून फिरताना दिसणारे पगमार्क ,लँडमार्क, वाघाच्या झाडांवरती केलेल्या मार्किंग, याबद्दल सविस्तर माहिती देत हा खुणा कशा पद्धतीने बनतात आणि याच्या मागचे हेतू काय ? याबद्दल सविस्तर माहिती देताना "आपल्या परिसरात आढळणाऱ्या प्रमुख वृक्षांबद्दल, पक्षांच्या, व प्राण्यांच्या बाबतीत आपल्याला ज्ञान असणे, परिसर अभ्यास असणे गरजेचे असून त्याचा अभ्यास करून ठेवा आणि त्याबद्दलही सविस्तर माहिती पर्यटकांना देत चला. सफारीला आलेल्या पर्यटकांची संयमाने आणि सौम्य वागणे गरजेचे आहे." असे वन्यजीव अभ्यासक, मार्गदर्शक यश कायरकर अध्यक्ष स्वाब संस्था, यांनी सांगितलं.
हे पक्षी निधीक्षक व गाईड मार्गदर्शनाचे कार्यक्रम सकाळी 7 वाजता ते दुपारी 11:30 पर्यंत राबविण्यात आला. या कार्यक्रमाकरिता संपूर्ण जिप्सी चालक आणि गाईड उपस्थित होते.
सिंदेवाही वनपरीक्षेत्र अधिकारी मा.अंजली सायंकर मॅडम ,सिंदेवाही क्षेत्रसहायक श्री.नितीन गडपायले व कच्चेपार बीटाचे वनरक्षक श्री.ऋषीकेश जावडे यांनी या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले.
टीप:- कच्चेपार सफारी मुख्य प्रवेशद्वार हा सिंदेवाही पासून पूर्वेस सिंदेवाही-कच्चेपार मुख्यमार्गावर 9KM अंतरावर आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!