परसबाग निर्मिती स्पर्धेत 'सावित्रीबाई फुले विद्यालय जिल्हा स्तरावर. जिल्हास्तरीय समितीकडून कौतुक; मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांच्या नेतृत्वाचे यश
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.१७/०१/२०२६ शालेय परिसरात निसर्गाची आवड जोपासण्यासोबतच विद्यार्थ्यांना सेंद्रिय भाजीपाल्याचे महत्त्व कळावे, या उद्देशाने आयोजित 'परसबाग निर्मिती' स्पर्धेत पवनी येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले.या यशाची दखल घेत जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने नुकतीच विद्यालयाला भेट देऊन पाहणी केली व शाळेच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.जि.प.भंडारा येथील लेखाधिकारी अभय निनावे यांच्या नेतृत्वाखालील समितीने विद्यालयातील परसबागेची प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी सांख्यिकी अधिकारी निकलेश दडमल,कृषी विस्तार अधिकारी संजय भटकर,डेटा एन्ट्री ऑपरेटर तुकाराम साखरवाडे आणि पं.स.पवनी येथील शा.पो. आ.डेटा एन्ट्री ऑपरेटर रिना सावरबांधे उपस्थित होते.समितीने परसबागेतील नियोजन,विविध प्रकारची झाडे आणि विद्यार्थ्यांचा सहभाग पाहून समाधान व्यक्त केले व विद्यालयाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांच्या हस्ते आलेल्या मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.या यशाबद्दल बोलताना मुख्याध्यापिकांनी हा विजय शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक मेहनतीचा असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी यांनी केले.
या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक वृंद संदीप मुंडले,ललिता डेकाटे,अरुणा कांबळे,अर्चना दडवे,मानसी ठवकर, विना जिभकाटे,सुमय्या शेख,प्रतिभा रामटेके,लिना शेंडे तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यालयाच्या या यशामुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!