शासकीय रेखाकला परीक्षेत लोकविद्यालय तळोधी (बा.) ची १०० टक्के निकालाची उज्ज्वल कामगिरी
तळोधी (बा.) :११ जाने२०२६
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ व कला संचालनालय, मुंबई यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, दि रूरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी (स्था. १९६०) द्वारा संचालित लोकविद्यालय तळोधी (बा.) येथील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.
या परीक्षेसाठी शाळेतून एकूण ५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एलिमेंटरी परीक्षेला ३२ तर इंटरमिजिएट परीक्षेला १९ विद्यार्थी बसले होते. सर्व ५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये ७ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ श्रेणी प्राप्त केली आहे.
रेखाकला परीक्षेत मिळालेल्या यशामुळे विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेत अतिरिक्त गुणांचा लाभ होणार आहे.
या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षक संतोष नन्नावार यांना विद्यार्थ्यांनी दिले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.व्ही.एस.तोंडरे, सचिव श्री.आर.एस. राऊत, सदस्य श्री. व्ही. एस. बगमारे, श्री. ए. आर. नागमोती, श्री. ए. एम. राऊत, श्री. डी. पी. समर्थ, गटशिक्षणाधिकारी संजय पालवे,केंद्रप्रमुख भारत बोरकर, मुख्याध्यापक श्री.पी.एल.बुराडे, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!