चक मानकापूर येथे वनहक्क समितीची सभा संपन्न - समिती कार्यालयाचे उदघाटन



सावली - 
वन विभागाची जमीन सामूहिक वनहक्क कायद्याद्वारे ग्रामसभेला मिळाली आहे. त्या सामूहिक जमीनीचे नियोजन करण्याच्या उद्देशाने वनहक्क समितीची सभा सावलीचे तहसीलदार प्रांजली चिरडे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी वनहक्क समिती कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.
       अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी कायदा २००६ अंतर्गत जंगलावर अवलंबून असणाऱ्या गावांना सामूहिक वनजमीन दिल्या जाते. तालुक्यातील तुकारामदादा गीताचार्य व डॉ. ब्राम्हदेव भारत सरकार आयुक्त यांच्या पदस्पर्शीत चक मानकापूर या संपूर्ण आदिवासी लोकवस्ती असलेल्या गावात वनक्षेत्रातील ३.३० हेक्टर जमीन सामूहिक वनहक्क पट्टा मिळाला आहे तर ४०० हेक्टर जमीन वनहक्क दाव्यासाठी जिल्हा समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. गावातील वनहक्क समिती ग्रामसभेच्या माध्यमातून सामूहिक वनजमिनीवर वृक्षारोपण, संवर्धन करणार असून तेंदूपत्ता, गौण खनीज व इतर वनउपजच्या उत्पन्नातून गावाचा विकास साधणार आहे. यावेळी सामूहिक वनहक्क फलक व समितीच्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाकरिता आदिवासी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, चिचबोडीचे सरपंच सतीश नंदगीरवार, मुरमाडीचे सरपंच रेवता मडावी,   वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, उपविभागीय समिती समन्वयक रजनी घुगरे, गडचिरोली जिल्हा वनहक्क समिती संघटक गुरूदास सेमस्कर, वनहक्क समिती अध्यक्ष श्रीकृष्ण गेडाम, चिंतामण बालमवार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!