गोठयात घुसून बिबट्याचा शेळयावर प्राणघातक हल्ला, १३ शेळया ठार, दोन जखमी
तळोधी बा-
दि .8/1/26 रात्रोला तळोधी बा. (नवानगर) येथील संदीप श्रीराम मोटघरे यांच्या स्वतां:च्या मालकीच्या गोठयातील १५ शेळया व बोकड हे बांधलेले होते. रात्रो एक वाजताच्या दरम्यान बिबट्या ने खिडकीतून उडी मारुन गोठयातील बांधलेल्या १३ शेळया जागीच ठार मारले. तर दोन जखमी केले. येथील तळोधी बा. वनविभागाचे क्षेत्रसहाय्यक अरविंद मने व स्वाब चे जिवेश सयाम चमू सहीत घटनास्थळी येवून पंचनामा केला. व शेतकऱ्याला नुकसान भरपाई ची हमी दिली.
सदर घटनेमुळे शेतकर्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. आणि उत्पन्नाचा संपूर्ण साधन नष्ट झाला. तरी वनविभागाच्या वतीने नुकसान झालेल्या शेतकरी वर्गाला त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शेतकऱ्याद्वारे मागणी करण्यात आली.
बिबट्याने तळोधीच्या नवानगर परिसरातील घरात घुसून हल्ला केल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली असून याठिकाणी पिंजरे लावून बिबटयांचा बंदोबस्त करण्यांची मागणी नवानगर वासीय जनतेनी केली आहे. तर वन विभागाद्वारे परिसरात बिबट्याचे बाबत असल्याने काही ट्राप कॅमेरे व या परिसरामध्ये सतत गस्त घालणार असून परिसरातील लोकांनी रात्री बाहेर शौचास जाऊ नये. व मुलांना एकट्यांना रस्त्यावर सोडू नये.असा सावधानतेचा इशारा वन विभागामार्फत देण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!