टॅंकरची ऑटोला धडक ; दोन महिला गंभीर जखमी -चेक आष्टा फाट्याजवळची घटना
टॅंकरची ऑटोला धडक ; दोन महिला गंभीर जखमी
पोंभूर्णा :- तालुक्यातील चेक आष्टा फाट्याजवळ भटारीला जाणाऱ्या ऑटोला टॅंकरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना दि.९ डिसेंबरला संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.मंगला कन्नाके वय (५५) रा.भटारी व रुसा आत्राम वय (६५)रा.भटारी असे जखमी महिलांचे नाव आहे.
पेसा गाव, पट्टे व इतर मागण्याला घेऊन पोंभूर्णा येथे आंदोलन सुरू आहे.या आंदोलनासाठी आलेल्या मंगला कन्नाके व रुसा आत्राम या दोन्ही महिला आंदोलन आटोपून भटारी कडे ऑटोने क्र.(MH34-BH-4146)जात असताना चेक आष्टा फाट्याजवळ रोड कामावर पाणी टाकण्याचे काम करणाऱ्या टॅंकरने (KA25-D-0911) ऑटोला जोरदार धडक दिली यात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या तर ऑटोचा चेंदामेंदा झाला.दोन्ही जखमींना पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांचेवर उपचार सुरू आहे.पुढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहेत.
-----
पोंभूर्णा -चिंतलधाबा मार्गावर होताहेत अपघात ----
महाराष्ट्र पायाभूत विकास महामंडळातर्फे जानाळा- पोंभूर्णा ते खरमत असा २०० कोटीच्या रस्त्याचे काम सुरू आहे.सदर कामाचे कंत्राट गुरुबक्सानी या कंत्राटदार कंपनीला देण्यात आले.मात्र कंत्राटदार कंपनीकडून जे कामे केल्या जात आहेत ते मनमर्जीने व नियमांचे उल्लंघन करून केल्या जात आहेत.सदर रोडचे काम करताना गाड्यांना ये-जा करण्यासाठी वळण मार्ग करणे बंधनकारक असताना सुद्धा वळण मार्ग न केले असल्याने याठिकाणी अनेक अपघात झाले आहेत.काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी अपघातात दोघांना जीव गमवावा लागला होता.तर काही जण गंभीररित्या जखमी झाले असल्याचे उदाहरण ताजे असताना सुद्धा संबंधित कंत्राटदार कंपनीकडून कोणतीही उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे.मुजोरीने काम करणाऱ्या सदर कंपनीच्या कामाची चौकशी करून कंत्राटदार कंपनीवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केल्या जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!