आदिवासी नेते जगन येलके यांच्या अन्नत्याग उपोषणाचा चौदावा दिवस ; अजूनही तोडगा नाही

आदिवासी नेते जगन येलके यांच्या अन्नत्याग उपोषणाचा चौदावा दिवस ; अजूनही तोडगा नाही

-आक्रमक आंदोलकांनी तीन तास केला रास्ता रोको  

-गोंडपिपरी-पोंभूर्णा मार्ग होता बंद 

-पेसा ग्राम,वनजमीनीच्या पट्ट्याची प्रमुख मागणी 



पोंभूर्णा :-पेसा ग्राम,वनजमीनीचे पट्टे आदी मागण्यांच्या पूर्ततेची प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर कोणतेही मागण्या पूर्ण न झाल्याने गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीचे नेते जगन येलके यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर मागील चौदा दिवसांपासून 
अन्नत्याग उपोषणाचे हत्यार उपसले पण शांततेत व न्यायिक लढा देऊनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या येलके यांच्या 
समर्थकांनी गोंडपिपरी-पोंभूर्णा मार्ग तीन तास अडवून ठेवला होता.मात्र जो पर्यंत मागण्या पूर्ण झाल्याचे लेखी आदेश मिळत नाही तोपर्यंत अन्नत्याग उपोषण व आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.

देवई,भटारी,केमारा या गावांना वनग्राम मधून काढून त्यांचे वनहक्के दावे तात्काळ मंजूर करून सामुहिक व वैयक्तिक पट्टे देण्यात यावे.तालुक्यातील आदिवासी गावांना पेसा गाव म्हणून घोषीत करण्यात यावे,इको पार्क जबाबदारी चेक आष्टा वनव्यवस्थापन समितीकडे देण्यात यावी या प्रमुख मागणीला घेऊन गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळ संघटनेचे संस्थापक जगन येलके यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण मागील चौदा दिवसांपासून सुरू आहे.प्रशासन फक्त आश्वासन देऊन दुर्लक्ष करीत असल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या येलके यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून गोंडपिपरी-पोंभूर्णा मार्ग बंद केला होता.तीन तास रस्ता बंद असल्याने गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.मात्र प्रशासनाने मध्यस्थी करून रस्ता खुला केला.दि.९ डिसेंबरला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी लघीमा तिवारी, तहसीलदार मोहनिश शेलवटकर,उप वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर गौरकार यांनी दिवसभर येलके यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तोडगा निघाला नव्हता.   

-------
प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी सकाळी सात वाजताच्या सुमारास थेट रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला होता.यावेळी गोंडपिपरी-पोंभूर्णा मुख्य मार्ग तीन तास बंद होता.दरम्यान एसटी बस व शालेय गाड्या व ॲम्ब्युलन्सला ये जा करण्यासाठी मुभा होती.प्रशासनाकडून उपविभागीय अधिकारी लघीमा तिवारी, तहसीलदार मोहनिश शेलवटकर, उपवनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे,उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यजीत आमले, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले,स्वीय सहाय्यक संतोष अतकरे,महाधनी, ठाणेदार राजकमल वाघमारे,नायाब तहसीलदार रामकृष्ण उईके,दिपाली आत्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर गौरकार,भाजपा तालुकाध्यक्ष हरिष ढवस यांनी उपोषणकर्ते जगन येलके व आंदोलकांशी चर्चा करून बंद असलेला मार्ग तीन तासांनंतर मोकळा करण्यात आला.गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीचे नेते जगन येलके यांच्या अन्नत्याग उपोषणाची सांगता करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला होता.संबंदधीत विषयाच्या अनुषंगाने अहवालही देण्यात आला मात्र जोपर्यंत पट्टे मिळणार नाही तोपर्यंत हटणार नाही असा पवित्रा येलके यांनी घेतल्याने अन्नत्याग उपोषण मागे घेण्यात आला नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!