पोंभुर्णात चार दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प; नागरिक संतप्त

पोंभुर्णात चार दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प; नागरिक संतप्त

मुख्याधिकारी राजुरा निवडणूक प्रभारी, नगराध्यक्ष व पाणीपुरवठा सभापतींचे दुर्लक्ष; कोटी रुपयांच्या योजनेवर प्रश्नचिन्ह


पोंभुर्णा : शहरातील पाणीपुरवठा मागील चार दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. पोंभुर्णा नगर पंचायतचे मुख्याधिकारी सध्या राजुरा नगर परिषद निवडणुकीत प्रभारी म्हणून नियुक्त असल्याने स्थानिक कामकाजाकडे स्पष्टपणे दुर्लक्ष झाल्याची नाराजी जनतेत व्यक्त होत आहे. नगराध्यक्ष, पाणीपुरवठा सभापती तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांकडूनही प्रभावी समन्वय न झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.

बल्लारपूर नगरपरिषदेचे अभियंता गणवीर हे पोंभुर्णा नगर पंचायत पाणीपुरवठा प्रभारी अभियंता म्हणून मागील तीन वर्षांपासून कार्यरत असून महिन्यातून एकदाच कार्यलयात दिसतात नियमित येत नसल्यामुळे देखभालीअभावी संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडली आहे.
 पाणीपुरवठा योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्यानंतरही मूलभूत पाणी पुरवठा सुरू ठेवण्यात नगर पंचायात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.

घाटकुड येथील वैगंगा नदीवरील मुख्य पाईपलाईनमध्ये मोठे लिकेज निर्माण झाले आहे. या बिघाडाची दुरुस्ती करण्यास नगर प्रशासनाला तीन दिवस लागूनही गती मिळालेली नाही. परिणामी शहरातील वॉर्डांत एक थेंब पाणी उपलब्ध होत नसल्याने  सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

 नगर पंचायात प्रशासन ‘कानाडोळा’ करीत असल्याचा नागरिकांचा आरोप असून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. वारंवार तक्रारी देऊनही ठोस कृती न झाल्याने रोष वाढत असून प्रशासनाने जबाबदारीची जाणीव ठेवून त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी सक्तीची भूमिका नागरिकांकडून घेतली जात आहे.पोंभुर्णा शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दुर्लक्षित यंत्रणेवर प्रश्न उपस्थित झाले असून या समस्येवर ठोस आणि तत्काळ उपाय अपेक्षित आहेत.
पोंभुर्ण्यातील पाणीटंचाईवर प्रशासन निष्क्रीय आहे. अधिकारी व पदाधिकारी या समस्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. नागरिक त्रस्त;असून कोट्यवधी रुपये खर्च करूनही मूलभूत सुविधा अपयशी असून त्वरित कायमस्वरूपी उपययोजना करावी.

आशिष कावटवार 
विरोधी पक्षनेता नगरपंचायत, पोंभूर्णा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!