२७ लाखाचा मुत्रीघर.. पाहायच आहे चला...
लाखांचं मूत्रीघर”! – नवभारत पत संस्थेच्या दुर्लक्षामुळे संपत्तीची दुर्दशा
✍️ विजय सिद्धावार
मूल |
"संस्था चालविणारे आहेत की संपत्ती गमावणारे?" — हा प्रश्न आता नवभारत कर्मचारी सहकारी पत संस्था, मूल यांच्या संचालक मंडळासमोर उभा ठाकला आहे.
सुमारे दहा वर्षांपूर्वी, पत संस्थेच्या कार्यासाठी नवभारत कॉम्प्लेक्समध्ये २७ लाख रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेले तीन गाळे, आज 'मूत्रीघर' म्हणून ओळखले जात आहेत!
सभेची मंजुरी होती... पण कायदेशीर प्रक्रियेची वाट!!
सर्वसाधारण सभेची संमती घेऊन संस्थेने गाळे खरेदी केली खरी, पण वकिलामार्फत सर्च रिपोर्ट नाही, मालमत्तेचे मूल्यांकन नाही, विक्रीपत्र नाही. संपूर्ण रक्कम देऊनही दहा वर्षांनंतरही विक्री प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
इतरांनी ताबा घेतला, संस्था मात्र गप्प!
या इमारतीतील इतर खरेदीदारांनी आपापले गाळे ताब्यात घेऊन व्यवसाय सुरू केले, पण पत संस्थेचे संचालक मंडळ मात्र आपली मालमत्ता मुत्री घरात रूपांतरित केली आहे आहे. परिणामी, संस्थेची ही महागडी गुंतवणूक धूळ खात पडून राहिली आहे.
एका कर्मचाऱ्याच्या विरोधामुळे मालमत्ता अडथळ्यात?
संस्थेतील एका विशिष्ट कर्मचार्याच्या या नव्या गाळ्यात प्रवेशास असलेल्या विरोधामुळे, संचालक मंडळातीलच एक जबाबदार पदाधिकारी या मालमत्तेचे मूत्रीघरात रूपांतर होऊ देत आहेत, असा गंभीर आरोप उपस्थित होतो आहे.
अडीच लाख रुपये मंजूर... तरी कार्यालय सुरू नाही!
याच ठिकाणी संस्थेचे कार्यालय सुरू करण्यासाठी अडीच लाख रुपयांचा प्रस्ताव 2023 -24 च्या वार्षिक आमसभेत एकमताने मंजूर करण्यात आला होता. मात्र एक आर्थिक वर्ष उलटूनही, ना कार्यालय सुरू झालं, ना गाळ्यांचा वापर झाला. नव्या इमारतीत कार्यालय सुरू करायचेच नव्हते तर अंदाजपत्रकात ही रक्कम टाकली कशाला? असा प्रश्नही आता उपस्थित झालेला आहे. उलट, २७ लाखांची गुंतवणूक आज ‘मूत्रीघर’ म्हणून उपहासाचा विषय बनली आहे.
हा अपव्यय, दुर्लक्ष व आळस याचा नमुना आहे का?
संस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्मचारी आणि हितचिंतक या गाळ्यांच्या वापराबाबत जबाबदार संचालक मंडळाकडून खुलासा आणि त्वरित कारवाईची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
संस्था कॉम्प्यूटराईज्ड करण्यासाठीचाही घोळ — भ्रष्टाचार की इगो !
..... लवकरच !
#सत्यवृत्त | #सहकारगोंधळ | #२७लाखांचंमूत्रीघर | #नवभारतपतसंस्था मूत्रीघर”! – नवभारत पत संस्थेच्या दुर्लक्षामुळे संपत्तीची दुर्दशा



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!