शोभाताई फडणवीस यांच्या पुढाकारातून आधार प्रमाणीकरण सुरू.

शोभाताई फडणवीस यांच्या पुढाकारातून आधार प्रमाणीकरण सुरू.

शेतकऱ्यांनी  व्यक्त केले आभार.


मुल(प्रती)

शासनाने आधार प्रमाणीकरण (ई - केवायसी) प्रक्रिया काही कारणामुळे  बंद केली. ही बाब हळदी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्यापुढे मांडली. त्यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेत शासनाला आधार प्रमाणीकरण करण्यास  बाध्य केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचे आभार मानले आहे.

तहसील कार्यालय मुल येथून पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. यादीतील पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करून आर्थिक मदत घेण्यासाठी सांगण्यात आले. पिक बुडीची यादी जाहीर झाल्यानंतर काही कारणामुळे आधार प्रमाणीकरण शासनाकडून बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी सरकारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 

आधार प्रमाणिकरण (ई - केवायसी ) प्रक्रिया चालू करून  तहसील कार्यालय मुल कडून जाहीर करण्यात आलेल्या यादीतील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण  प्रक्रिया पूर्ण करावी  आणि शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा अशी विनंती हळदी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी  माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्याकडे केली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता  जाहीर करण्यात आलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण लवकर करून देण्यात यावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी सरकारकडे केली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने ही बाब तात्काळ निकाली काढण्याचे आदेश देऊन आधार प्रमाणिकरण प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे हळदी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकार  तसेच माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!